Delhi CM Arvind Kejriwal refuses to answer when asked about AAP Rajya Sabha MP Swati Maliwals  Esakal
देश

अमित शाहांच्या पंतप्रधानपदाची तारीख सांगितली पण मालीवाल यांचा प्रश्न आल्यावर मात्र... केजरीवालांच्या मदतीला धावले अखिलेश

आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षाची लखनऊमध्ये संयुक्त पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी त्यांना स्वाती मालीवाल यांना प्रश्न करण्यात आला तेव्हा केजरीवाल यांनी या प्रश्नाला उत्तर देणे टाळले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीच्या राजकारणामध्ये गेल्या ४ ते ५ दिवसांपासून स्वाती मालीवाल यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर मारहाण झाल्याची आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याची घटना घडली होती. दरम्यान आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षाची लखनऊमध्ये संयुक्त पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी त्यांना स्वाती मालीवाल यांना प्रश्न करण्यात आला तेव्हा केजरीवाल यांनी या प्रश्नाला उत्तर देणे टाळले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वाती मालीवाल यांच्या मुद्द्यावर अद्याप मौन सोडलेले नाही. गुरुवारी जेव्हा ते समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत लखनऊमध्ये माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले तेव्हा त्यांच्यावर स्वाती मालीवाल आणि बिभव कुमार यांच्याशी संबंधित प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आधी अखिलेश यादव यांनी प्रश्न टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि नंतर संजय सिंह यांनी माईक हातात घेऊन भाजपला प्रश्न करत हल्लाबोल केला. त्यांनी मणिपूरपासून प्रज्वल रेवण्णापर्यंतचे मुद्दे उपस्थित केले.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची युती आहे. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या आम आदमी पक्षाचे प्रमुख दोन्ही पक्षांना पाठिंबा देण्यासाठी करण्यासाठी लखनौला पोहोचले. बुधवारी रात्री ते लखनौला पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत बिभव कुमारही दिसून आले, ज्यांच्यावर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे.

केजरीवाल सकाळी सपा कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भाजप जिंकल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी निवृत्त होतील आणि अमित शाहांना पंतप्रधान करतील, असा दावा त्यांनी पुन्हा केला. भाजपला 400 जागा मिळाल्यास एससी-एसटी आणि ओबीसीचे आरक्षण संपुष्टात येईल, असा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT