Crime News Esakal
देश

Crime News: दुसऱ्या दिवशी निघणार होती वरात, मात्र आदल्या रात्री वडिलांनीच केली मुलाची निर्घृण हत्या.. कारण ऐकून पोलीसही हैराण!

Crime News: राजधानी दिल्लीत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे तरुणाच्या लग्नाच्या काही तासांपूर्वीच वडिलांनी साथीदारांसह मुलाची हत्या केली. यानंतर तो दागिने व इतर मौल्यवान वस्तू घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमागील कारण जाणून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Crime News: राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे लग्नाच्या एक रात्री वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केली. ही घटना दिल्लीतील देवळी भागात घडली. घटनेनंतर वडील फरार झाले. पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री जयपूर येथून पकडले. गौरव सिंघल असे मृत तरुणाचे नाव आहे. तो दिल्लीत जिम चालवायचा. गौरववर 15 वार करण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवली एक्स्टेंशन येथील राजू पार्क येथून ७ मार्चच्या मध्यरात्री साडेबारा वाजता हत्येची माहिती मिळाली. माहिती मिळताच तिगरी पोलीस ठाणे आणि पीसीआर व्हॅन घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान गौरव सिंघल नावाच्या २९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कुटुंबीयांनी त्याला मॅक्स रुग्णालयात नेले. यानंतर पोलिसांचे पथक हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच गौरवचा मृत्यू झाला होता. (The groom was going to leave the next day, but the father brutally killed the son the night before)

गौरव सिंघलचे नुकतेच लग्न झाले. घटना घडली त्यावेळी कुटुंबीय शेजारील घरात एका लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यादरम्यान वडिलांनी तीन जणांसह मुलगा गौरवचा घरातच खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.

या घटनेबाबत दक्षिण जिल्ह्याचे डीसीपी काय म्हणाले?

दक्षिण जिल्ह्याचे डीसीपी अंकित चौहान सांगतात की, गौरवचे वडील रंगलाल सिंघल यांनी घरातून पळून जाताना 50 लाख रुपयांचे दागिने आणि 15 लाख रुपये रोख घेतले होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचा मुलगा गौरव याच्याशी काही कारणावरून भांडण झाल्याचा संशय पोलिसांना आहे. यावेळी गौरवने त्याचे वडील रंगलाल यांना मारहाण केली, त्यानंतर रंगलालने त्याच्या तीन साथीदारांसह गौरवची हत्या केली आणि घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला.

या घटनेत आणखी एक गोष्ट समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गौरव सिंघलला लग्न करायचे नव्हते. त्याला दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे होते, मात्र घरच्यांच्या दबावामुळे तो लग्न करत होता. यावरून पिता-पुत्रांमध्ये वारंवार भांडणे होत होती.

३१ मार्चच्या मध्यरात्री अशी काय परिस्थिती होती की एका बापाने आपल्याच मुलाची हत्या केली? पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुढील तपासासोबतच तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. रंगलालला मायग्रेनचा त्रास होता आणि तो खूप औषधेही घेत होता, अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Buses Crash : गुजरातमधील सुरतमध्ये भीषण बस अपघात; महाराष्ट्रातील दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक, सहा जणांचा मृत्यू

MP Supriya Sule : गुन्हेगारी कमी झाल्याचे पत्र शहा-फडणवीसांना पाठवा! पोलिस आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांचा पोलीस आयुक्तांना टोला

Latest Marathi News Live Update : सुरतमध्ये दोन बसची धडक: 6 जणांचा मृत्यू

Monsoon: काही तास बाकी! लवकरच मान्सून केरळात धडकणार, राज्यात जोरदार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

IPL 2026: RCB च्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये विराटची भुवनेश्वर कुमारसोबत फुगडी; Viral Video ने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT