Delhi High Court esakal
देश

Delhi High Court : उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; 8 महिन्यांनंतरच्या गर्भपातालाही परवानगी!

महिलेनं आपला 33 आठवड्यांचा गर्भ काढून टाकण्याची परवानगी मागितली होती.

सकाळ डिजिटल टीम

महिलेनं आपला 33 आठवड्यांचा गर्भ काढून टाकण्याची परवानगी मागितली होती.

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi High Court) 33 महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या याचिकेवर मोठा निकाल दिलाय. उच्च न्यायालयानं 26 वर्षीय विवाहित महिलेची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी दिलीय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, कोर्टानं ही मान्यता दिली आहे.

मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयाच्या (Loknayak Jayaprakash Narayan Hospital) डॉक्टरांच्या समितीनं गर्भ काढणं योग्य नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर उच्च न्यायालयानं काही डॉक्टरांशी बोलून गर्भ काढण्याचे आदेश दिले. वास्तविक, याचिकाकर्त्या महिलेनं आपला 33 आठवड्यांचा गर्भ काढून टाकण्याची परवानगी मागितली होती.

12 नोव्हेंबरला अल्ट्रासाऊंड तपासणीत महिलेच्या पोटातील गर्भाला सेरेब्रल डिसऑर्डर असल्याचं समोर आलं. अल्ट्रासाऊंड चाचणीची पुष्टी करण्यासाठी याचिकाकर्त्या महिलेनं 14 नोव्हेंबरला खासगी अल्ट्रासाऊंडमध्ये स्वतःची तपासणी केली. त्यातही गर्भात सेरेब्रल डिसऑर्डर आढळून आलं. याचिकाकर्त्याच्या बाजूनं उपस्थित असलेल्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) आणि कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निकालाचा हवाला दिला की, MTP कायद्याच्या कलम 3(2) (B) आणि 3(2)(D) नुसार गर्भ काढून टाकण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

याच्या एक दिवस आधी सोमवारी एका 26 वर्षीय महिलेच्या याचिकेवर हायकोर्टानं निर्णय राखून ठेवला होता. यामध्ये महिलेनं गर्भातील काही न्यूरोलॉजिकल विकृतींमुळं 33 आठवड्यांच्या गर्भधारणेचा गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

Maharashtra Politics : ऑपरेशन ‘बुडवा’; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नव्या वळणावर उभा

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT