देश

देशात किती जणांना मिळते Z+ सुरक्षा? गृह मंत्रालयानं केलं स्पष्ट 

सकाळवृत्तसेवा

देशात किती जणांना Z+ सुरक्षा मिळते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर गृह मंत्रालयानं दिलं आहे. लोकसभा अधिवेशनात आज, बुधवारी हा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना गृह मंत्रालयानं  सांगितलं की, देशात ४० लोकांना Z+ सुरक्षा दिली जातेय. केंद्रीय सुरक्षा एजन्सीनं दिलेल्या माहितीवर  इंटेलिजेन्स ब्यूरो (आईबी)च्या रिपोर्ट्सनंतर Z+ सुरक्षा पुरवली जाते, असेही गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 

देशातील लोकांच्या सुरक्षेबाबत गृह मंत्रालयाने लोकसभेत उत्तर दिलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी म्हणाले, "देशात २३० लोकांना एनएसजी , सीआरपीएफ, सीआईएसएफ आणि आईटीबीपी सारख्या केंद्रीय निमलष्करी दलांकडून 'झेड प्लस', 'झेड' आणि 'वाय' दर्जाची सुरक्षा प्रदान केली जात आहे. ४० जणांना झेड प्लस सुरक्षा दिली जाते." रेड्डी यांनी लोकसभेत एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना ही माहिती दिली. 

रेड्डी म्हणाले, ज्या लोकांना सुरक्षा प्रदान केली जाते, या सुरक्षेबाबत वेळोवेळी समिक्षा केली जाते. या समिक्षणानंतर संबंधित नेत्याचं सुरक्षा कवच सुरु ठेवायचं की नाही यावर निर्णय घेतला जातो. सध्या या सुरक्षा कवचासाठीच्या यादीमध्ये २३० जणांची नावं आहेत. सर्वसाधारणपणे या लोकांच्या सुरक्षेचा खर्च सरकारद्वारे केला जातो. मात्र, या दर्जाच्या सुरक्षेसाठी नक्की किती खर्च होतो याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. 

झेड प्लस सुरक्षासाठी किती कमांडो असतात?
सुरक्षेच्या ब्लू बुकनुसार, प्रत्येक व्हीआयपीला झेड प्लस सुरक्षा दिली जाते. त्या व्हीआयपीच्या चारी बाजूंनी सुरक्षारक्षकांचा वेडा असतो. सुत्रांच्या माहितीनुसार, ५८ कमांडो झेड प्लस दर्जाची सुरक्षा देतात.  व्हीआयपी लोकांच्या घरी जाणाऱ्या लोकांच्या तपासासाठी  फ्रीस्किंग आणि स्क्रीनिंगसाठी सहा जणांची नियुक्ती करण्यात येते.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT