Devendra Fadnavis Death Threat Esakal
देश

Devendra Fadnavis Death Threat: देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला साताऱ्यातून अटक, आरोपीला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Devendra Fadnavis Death Threat: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयावरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Devendra Fadnavis Death Threat: भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा देखील वापरण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. त्याला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

किंचक नवले याचा देवेंद्र फडणवीसांना धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात येत होता. तो वेशांतर करुन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. आता सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने मुंबईतल्या सांताक्रूझ पोलिसांनी काल(शनिवारी) त्याला साताऱ्यातील बाजार या ठिकाणाहून अटक केली आहे. याआधी योगेश सावंत यालाही अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : महामार्गावर ट्रॅव्हल अन् ‘ट्रेलर’चा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

ठरलं तर मगची घसरण कायम पण तू हि रे माझा मितवाने गड राखला ; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी

Bhiwandi: भिवंडी महापालिकेत बदलींचा धडाका, कामगार संघटनांची तीव्र नाराजी; कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Jyotiba Temple : २५९ कोटींचा विकास आराखडा; जोतिबा-यमाई मंदिराचा होणार भव्य कायापालट

SCROLL FOR NEXT