Afghanistan Plane Crash eSakal
देश

Afghanistan Plane Crash : अफगाणिस्तानमध्ये क्रॅश झालेलं विमान भारतीय नाही; DGCA ने दिली दिलासादायक माहिती!

अफगाणिस्तानमध्ये भारताचं एक विमान क्रॅश झाल्याची माहिती तेथील स्थानिक माध्यमांनी दिली होती.

Sudesh

Plane Crashed in Afghanistan Not Indian : अफगाणिस्तानमध्ये भारताचं एक विमान क्रॅश झाल्याची माहिती तेथील स्थानिक माध्यमांनी दिली होती. मात्र, आता भारत सरकारने हे विमान भारतीय नसल्याचं स्पष्ट केलं आहे. DGCA ने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

"अफगाणिस्तानमध्ये झालेली ही घटना दुर्दैवी आहे. मात्र हे विमान भारतीय नाही. हे इंडियन शेड्यूल्ड एअरक्राफ्ट किंवा भारतीय चार्टर्ड विमानही नाही. हे मोरक्को-रजिस्टर्ड लहान विमान आहे." अशी माहिती DGCAने दिली.

'ते' विमान रशियाचं?

दरम्यान, रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक रशियन विमान हे शनिवारी रात्री अफगाणिस्तान जवळ असताना रडारवरुन गायब झालं. या विमानामध्ये सहा प्रवासी होते. हे विमान डसॉल्ट फाल्कन 10 जेट होतं. हे चार्टर्ड प्लेन भारतातून मॉस्कोकडे प्रवास करत होतं. उझबेकिस्तान मार्गे हे विमान प्रवास करत होतं.

अफगाणिस्तानमधील स्थानिक माध्यमांनी माहिती मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटलं होतं, की भारतातून मॉस्कोकडे जाणारं एक विमान अफगाणिस्तानच्या बदख्शां प्रांतामध्ये कोसळलं आहे. हे विमान भारतीय असल्याचा दावा तालिबानने केला होता. मात्र, आता भारत सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

SCROLL FOR NEXT