देश

Karnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या...डी के शिवकुमार यांनी स्वतःच दिले संकेत

डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून तणावाचे संबंध

धनश्री ओतारी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार ही दोन्ही नावं मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ मानली जात आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच होणार अशी चर्चा सुरु आहे. अशातच ...डी के शिवकुमार यांनी स्वतः यासंदर्भात संकेत दिल असल्याचे बोलले जात आहे.

डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून तणावाचे संबंध असल्याची चर्चा आहे. अशातच डी के शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले डी के शिवकुमार?

काही लोक म्हणतात की, माझे सिद्धरामय्या यांच्याशी मतभेद आहेत. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मी पक्षासाठी अनेक त्याग केले आहेत आणि सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. मी सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला आहे. अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणं आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच होणार याचे संकेतही शिवकुमार यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे.

त्याच्या खूप पुढे जात 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे, तर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने नाकारलं आहे. भाजपची 65 जागांवर घसरगुंडी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

बापरे! राणादाने घटवलं तब्बल २५ किलो वजन, व्यायामाबद्दल बोलताना हार्दिक जोशी म्हणाला...

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

SCROLL FOR NEXT