udaynidhill criticize ram mandir event 
देश

Udhayanidhi: सनातननंतर उदयनिधी यांचा राम मंदिराला विरोध; वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता

Udaynidhill criticize Ram Mandir Event: तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि सरकारमधील मंत्री उदयनिधी यांच्या राम मंदिराबाबतच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी राम मंदिराच्या निर्माणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि सरकारमधील मंत्री उदयनिधी यांच्या राम मंदिराबाबतच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी राम मंदिराच्या निर्माणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मशीद तोडून त्याठिकाणी मंदिर बांधणे हे डीएमकेला मान्य नाही, असं ते म्हणाले आहेत. (dmk stalin son udaynidhill criticize ram mandir event )

उदयनिधी यांनी यापूर्वी केलेल्या काही वक्तव्यांमुळेही वाद निर्माण झाला आहे. त्यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना विषाणू आणि डेंगुशी केली होती. त्यानंतर त्यांच्या ताज्या वक्तव्याने वाद निर्माण होऊ शकतो. स्टॅलिन यांचा पक्ष डीएमके हा इंडिया आघाडीसोबत आहे. त्यामुळे भाजप या मुद्द्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता आहे.

उदयनिधी हे चेन्नईमध्ये पत्रकारांशी बोलत होते. डीएमके कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण, मशीद पाडून त्या ठिकाणी मंदिर निर्माण करणे आम्हाला मान्य नाही, असं म्हणत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केलीये. तमिळनाडूमध्ये विरोधी पक्ष AIADMK ने देखील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, उदयनिधी यांना तमिळनाडूमध्ये उपमुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता आहे. अधिकृतरीत्या याबाबत काहीही सांगण्यात आलं नाही. पण, चर्चा जोरदार सुरु झाल्या आहेत. उदयनिधी यांनी मात्र याला अफवा म्हणत फेटाळलं आहे.

सनातन धर्मावर टीका

उदयनिधी यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. काही गोष्टींचा विरोध केला जात नाही. त्यांना संपवलं जातं. आपण डेंगु, मलेरिया कोरोना यांचा विरोध करत नाही. त्यांना नष्ट करावं लागतं. तसंच सनातन धर्माला देखील आपल्याला नष्ट करावं लागेल, असं ते एका कार्यक्रमात म्हणाले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १० वा दिवस, पाणी सलाईन घेण्यास नकार

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

Miami Airport Plane Crash : ॲमेझॉनचं विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरलं अ्न रस्त्यावर आलं, वाहनांना धडक; ५ जणांचा मृत्यू

पुन्हा पुन्हा तेच चेहरे पाहून कंटाळली तापसी पन्नू? बॉलीवूडच्या कास्टिंगवर तापसी पन्नूची टीका करत म्हणाली, 'रोमँटिक कॉमेडीत तेच...'

SCROLL FOR NEXT