Uma Bharti Sakal
देश

Uma Bharti News : दूध प्या; दारूच्या दुकानांसमोर गायी बांधून भाजपा नेत्याचं अनोखं आंदोलन

उमा भारती सध्या दारूच्या सेवनाविरोधात आंदोलन करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भाजपा नेत्या उमा भारती यांनी दारुच्या दुकानांसमोर अनोखं आंदोलन केलं आहे. दूध प्या असं आवाहन करत त्यांनी दारुच्या दुकानांसमोर गायी बांधल्या आहेत. तसंच या दुकानांसमोर त्या 'दारु नको दूध प्या' अशा घोषणाही देत आहे.

मध्य प्रदेशातल्या ओरछा इथं हे आंदोलन होत आहेत. दुकानांच्या समोर उभं राहून उमा भारती यांनी 'दारू नको, दूध प्या' अशा घोषणा दिल्या. गेल्या वर्षी जूनमध्ये उमा भारती यांनी दारुच्या दुकानावर शेण फेकलं होतं.

उमा भारती या सध्या दारुविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं करत आहेत. त्यांनी दारुबद्दलच्या धोरणामध्ये काही बदलही सुचवले आहेत. राज्याच्या धोरणामध्ये दारूचं व्यसन सोडवण्यावर जास्तीत जास्त भर दिला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गेल्या महिन्यामध्ये उमा भारती भोपाळच्या मंदिरात गेल्या होत्या आणि जोवर दारूबद्दलचं धोरण जाहीर होत नाही, तोवर आपण या मंदिरातच राहणार असल्याची घोषणा उमा भारती यांनी केली आहे. गायींसोबतचं आंदोलन ज्या दुकानात झालं, ते दुकान या मंदिराच्या समोरच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: गौतम गंभीर भारतीय संघासोबत झिम्बाब्वेत का नाही? मुख्य प्रशिक्षक मग कोण? BCCI ने घेतला निर्णय

Anna Hazare: विद्यार्थ्यांसाठी मूक आंदोलन पुकारलं; अण्णा हजारेंना रडू कोसळलं, भावनिक व्हिडिओ व्हायरल, कारण काय?

Mumbai Pollution: पृथ्वीला प्रदूषणाचा विळखा, पीओपी बंदीचे समर्थन; याचिकाकर्त्यांचा न्यायालयात युक्तिवाद

Latest Marathi Update : काँग्रेस खासदार राहुल गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघाले

Indigenous Rice Aambegaon: आंबेगावात दुर्मिळ देशी भात वाण संवर्धनासाठी लागवड प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT