earthquake 
देश

भारतातील तीन राज्यांत भूकंप; अशी आहे सद्यस्थिती...

कृपादान आवळे

नवी दिल्ली : भारतातील तीन राज्यांत आज (गुरुवार) सकाळी एकापाठोपाठ एक असे भूकंपाचे धक्के जाणवले. हिमाचल प्रदेश, गुजरात त्यानंतर आसाममध्ये भूंकप झाला. मात्र, त्यामध्ये कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती दिली जात आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या मते, गुजरातच्या राजकोटमध्ये स्थानिक वेळेनुसार, आज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी होती. तर आसाममध्ये करीमगंजमध्ये सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी भूकंप झाला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 4.1 इतकी नोंदविण्यात आली. 

6 जुलैलाही भूकंप

गुजरातमध्ये एक नाही तर तब्बल 5 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते. सर्वाधिक तीव्रता 4.2 रिश्टर स्केलवर नोंद करण्यात आली. याचे केंद्रबिंदू गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील भचाऊपासून 14 किमी दूर आहे. त्यापूर्वी त्याचदिवशी दुपारी 1.50 पासून 4.32 यादरम्यान 1.8, 1.6 आणि 2.1 तीव्रतेचा भूकंप झाला. यादरम्यान चार झटके जाणवले. 

मिझोराममध्येही आला होता भूकंप

यापूर्वीही मिझोराममध्येही गुरुवारी 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता. भूकंपाचे धक्के भारत-म्यानमार सीमेवर स्थित चंफाई जिल्ह्यात जाणवले. मागील तीन महिन्यात देशातील विविध राज्यात कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दिल्ली एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, झारखंड, जम्मू-काश्मीर, मिझोराम, ओडिशा, छत्तीसगड यांसारख्या राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर या राज्यात मोठी दहशत पसली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT