Earthquake esakal
देश

Earthquake in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीतीमध्ये भूकंप, ३.४ रिश्टर स्केल तिव्रता

Sandip Kapde

Earthquake in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.4 मोजली. लाहौल स्पितीमध्ये अचानक झालेल्या भूकंपामुळे घरे हादरली. लोक घाबरले, घराबाहेर पडू लागले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात बुधवारी 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी आणि 11 सेकंदला भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

पावसाचा देखील कहर -

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा देखील कह सुरु आहे. आता भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आही. सिरमौरमध्ये काल (बुधवार) झालेल्या ढगफुटीमुळे गिरी नदीच्या पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. (latest marathi news)

24 जूनपासून सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे राज्य सरकारचे आतापर्यंत 6687.22 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पुरामुळे 300 हून अधिक रस्ते अजूनही बंद आहेत.

राज्याच्या वरच्या भागात पुरामुळे अधिक नुकसान होत आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. या आपत्तीत आतापर्यंत 223 जणांचा मृत्यू झाला आहे तर 295 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. DNA ने याबाबत वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT