Tamil Nadu ED eSakal
देश

Tamil Nadu ED : तमिळनाडूत चक्क ‘ईडी’वर पोलिसांचा छापा; २० लाखांची लाच घेणारा अधिकारी अटकेत

ED Officer Arrested : अंकित तिवारी असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून त्याला तूर्त १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

राज्य सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याकडून वीस लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी आज मदुराईमध्ये चक्क सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यालाच अटक केली.

पोलिस अधिकाऱ्यांनी या चौकशीचा एक भाग म्हणून केंद्रीय तपास संस्थेची कार्यालये आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची देखील झडती घेतल्याचे समजते. या कारवाईमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

दरम्यान ‘ईडी’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यास तमिळनाडूमध्ये अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अंकित तिवारी असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून त्याला तूर्त १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान पोलिसांच्या या कारवाईवर तपास संस्थेने मात्र कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. मध्यंतरी मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ‘ईडी’ने पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावले होते त्यामुळे राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा असा संघर्ष निर्माण झाला होता.

याच आठवड्यात मद्रास उच्च न्यायालयाने ‘ईडी’च्या समन्सला तीन आठवड्यांसाठी स्थगिती दिल्याने मुख्यमंत्री स्टॅलिन यांना दिलासा मिळाला होता. अरियालूर, वेल्लोर, तंजावर, करूर आणि तिरुचिरापल्ली जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले होते. यासाठी अधिकाऱ्यांना प्रतिसाद देण्यासाठी ‘ईडी’कडून राज्य सरकारला तीन आठवड्यांचा वेळही दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT