Viral Video  esakal
देश

Viral Video: हत्तीचा नाद केला, वाघ पळून गेला!

नाद करा पण हत्तीचा कुठं...अशा आशयाच्या प्रतिक्रिया त्या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Hathi Aur Bagh Ka Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेटकऱ्यांची नेहमीच पसंती मिळत असते. त्यावर नेटकऱ्यांच्या मिळणाऱ्या कमेंटही भन्नाट असतात. त्यात जंगली प्राण्यांच्या शिकारीच्या काही क्लिप्स जेव्हा व्हायरल होतात त्यावेळी त्याला मिळणाऱ्या कमेंटस आवर्जुन वाचण्यासारख्या असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात वाघाला गजराजापुढे माघार घ्यावी लागल्याचे दिसून आले आहे. त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांकडून व्ह्युज मिळाले आहेत.

नाद करा पण हत्तीचा कुठं...अशा आशयाच्या प्रतिक्रिया त्या व्हिडिओवर आल्या आहेत. अनेकांनी हत्तीच्या ताकदीपुढे वाघोबाला माघार घ्यावी लागली आहे. असं म्हणत वाघ असला म्हणून काय झालं, हत्तीपुढे काही नाही. असं म्हणून हत्तीला आपला पाठींबा जाहिर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एरवी वाघ म्हटलं की भल्याभल्यांची तंतरते. मात्र त्या वाघाला हत्तीसमोर पत्करावी लागलेली शरणागती अनेकांच्या कमेंटला कारण ठरत आहे.

त्या व्हिडिओमध्ये वाघ हत्तीच्या शिकारीला निघाल्याचे दिसते आहे. तो हत्तीची शिकार करणार तोच हत्तीनंच त्याला पळवून लावलं आहे. हत्तीच वाघाचा पाठलाग करताना दिसतो आहे. पहिल्यांदा हत्ती निवांतपणे उभा असताना वाघाला त्याला खायची हुक्की आली. त्यानंतर त्यानं त्याच्या शिकारीचा विचार केला. तेवढ्यात हत्तीला वाघाच्या मनसुब्याची कल्पना आली. मात्र गजराजानं वाघोबाला पळवून लावलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांच्या मिळालेल्या प्रतिक्रिया वाचण्यासारख्या आहेत. त्यात अनेकांनी हत्तीची शिकार वाघाला कशाप्रकारे महाग पडले हे सांगितलं आहे. हत्ती तो हत्तीच वाघानं त्याच्या शिकारीचा नाद सोडून द्यावा. अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT