army 
देश

पुलवामा चकमक: एक जवान शहीद, लष्कराने 4 दहशतवाद्यांना घेरलं

कार्तिक पुजारी

शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. भारतीय लष्कर, पुलवामा पोलीस आणि सीआरपीएफने या ऑपरेशनमध्ये भाग घेतला आहे.

नवी दिल्ली- शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. भारतीय लष्कर, पुलवामा पोलीस आणि सीआरपीएफने या ऑपरेशनमध्ये भाग घेतला आहे. पुलवामातील हांजी राजपुरा येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Encounter breaks out between terrorists and security forces in Hanjin Rajpora area of Pulwama ammu and Kashmir)

पुलवामा एन्काउंटरमध्ये दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. संयुक्त सुरक्षा दलांनी या भागात सर्च ऑपरेशन सुरु केले होते. त्यानंतर चकमकीस सुरुवात झाली. राजपूरा भागातील हांजी गावामध्ये अनेक दहशतवाद्यांनी आश्रय घेतला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर हे सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले.

सुरक्षा दल आणि पोलीस गावात पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. आतापर्यंत कोणत्याही नुकसानीची बातमी नाही. पण, कमीतकमी तीन ते चार दहशतवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात अडकल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, एका दिवसापूर्वी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरातील दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मागील सहा महिन्यात सुरक्षा दलांनी 61 दहशतवाद्यांना संपवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरण निम्म्याहून अधिक भरलं! पण 100 टक्के भरण्यासाठी अजून किती टीएमसी पाण्याची गरज? पाहा लेटेस्ट अपडेट

IND vs ENG Weather Update: भारत-इंग्लंड शेवटच्या टी२० सामन्यात पावसाचा धुमाकूळ की होणार पूर्ण खेळ? हवामान खात्याने दिला 'हा' इशारा...

Latest Marathi News Live Update : येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Hingoli: माळसेलूत चिखल तुडवत विद्यार्थी शाळेत ; रस्त्याची दुरवस्था; पालकांत तीव्र संताप; आरोग्याचा प्रश्नही गंभीर, ग्रामपंचायतीचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या 2 तरुणांची 10 तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात 112 तरुणांची झाडाझडती

SCROLL FOR NEXT