animation visual effects gaming and comics  SAKAL
देश

‘एव्हीजीसी’साठी कृती समिती स्थापन

अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी करणार शिफारशी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कॉमिक सेक्टरला (एव्हीजीसी) प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आता पावले टाकायला सुरूवात केली असून यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या क्षेत्रातील उच्चशिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी ही कृती समिती शिफारशी करेल. येत्या २०२५ पर्यंतचा विचार केला तर या क्षेत्रासाठीच्या जागतिक बाजारपेठेत पाच टक्के (४० अब्ज डॉलर) वाटा उचलण्याचे सामर्थ्य भारतामध्ये आहे.

वार्षिक उलाढाल ही साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत अपेक्षित आहे. देशात यामुळे साधारणपणे दरवर्षी १ लाख ६० हजार नोकऱ्या निर्माण होऊ शकतात अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली. ही कृती समिती पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी शिफारशी करेल. या कृती समितीमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्रालय, कौशल्यविकास आणि नवउद्योजकता मंत्रालय, शिक्षण विभागांतर्गत येणारा उच्च शिक्षण विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन देणाऱ्या विभागाच्या सचिवांचा त्या समितीमध्ये समावेश असेल. कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणच्या प्रतिनिधींप्रमाणेच विविध शिक्षण संस्थांच्या प्रमुखांचाही या कृती समितीमध्ये समावेश करण्यात करण्यात येईल.

नव्वद दिवसांमध्ये आराखडा सादर होणार

‘एव्हीजीसी’ या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ही कृती समिती केंद्र आणि राज्य सरकारे तसेच या क्षेत्रातील महत्त्वाचे उद्योजक यांच्या सहकार्याने धोरणे तयार करण्याचे काम करेल. या क्षेत्रातील शिक्षणासाठीची मानकेही या माध्यमातून निश्चित करण्यात येतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारताचे स्थान निश्चित करण्यासाठी देखील या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. ही कृती समिती येत्या ९० दिवसांमध्ये याबाबतचा आराखडा सादर करेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT