Narendra modi 
देश

No Confidence Motion: विश्वास मोदींवरच, पण विजय 'इंडिया'चा! अविश्वास ठरावात NDAला स्पष्ट बहुमत

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवरून विरोधीपक्ष आक्रमक झाला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वीच विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी तयार केली असून एकतेने मोदी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला आहे. तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारावरून आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती.

मोदींनी सभागृहात बोलवं या उद्देशाने विरोधाकांनी अविश्वास ठराव मांडला होता. त्यात मोदींच्या नेतृत्वातील एनडीएचा दणदणीत विजय झाला. मात्र त्याचवेळी मोदींना सभागृहात मणिपूर हिंसाचारावर बोलायला भाग पाडल्याने इंडियाचा एकप्रकारे विजय झाला आहे.

मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सर्व विरोधीपक्ष करत होते. शिवाय मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही, असा सवालही विरोधक करत होते. यावर बुधवारी अमित शहा यांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र मणिपूर मुद्दावर मोदींनी बोलावे, असा आग्रह विरोधकांकडून सुरू आहे. यावर आज मोदींनी लोकसभेत भूमिका स्पष्ट केली.

लोकसभेत पार पडलेला अविश्वास ठराव आज लोकसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला आहे. विरोधकांनी वॉकऑऊट केल्यामुळे आवाजी मतदानाने प्रस्तावर फेटाळून लावण्यात आला. तसेच काँग्रेस नेते अधिरंजन चौधरी यांच लोकसभा अध्यक्षांनी निलंबन केलं आहे.

एकूणच प्रचंड बहुमत असलेल्या एनडीएचा अविश्वास ठरावात विजय होणार हे निश्चित होतं. विरोधकांनी देखील आम्ही केवळ मोदींनी सभागृहात मणिपूरवर आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठीच अविश्वास ठराव आणल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीचा उद्देश आज पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं. तर एनडीएला देखील बदलेल्या राजकीय परिस्थिती आपल्यामागे किती बहुमत आहे, हे स्पष्ट झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT