Farmer Agitation sakal
देश

Farmer Agitation : शेतकरी संघटनांचा आज ‘काळा दिवस’; शेतकरी मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाची धग वाढत चालली असून खानौरी सीमेवरील चकमकीमध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली / चंडीगड - दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाची धग वाढत चालली असून खानौरी सीमेवरील चकमकीमध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. या घटनेच्या निषेधार्थ आज (ता.२३) देशभर काळा दिवस पाळण्यात येणार असून १४ मार्चला रामलीला मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा किसान मोर्चाकडून आज करण्यात आली आहे.

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर शेतकरी संघटनांनी ‘दिल्ली चलो’ आंदोलनास तूर्त ब्रेक लावला आहे. ‘ शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,’ अशी मागणी शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे २५ ते ३० ट्रॅक्टर आणि ट्रॉली यांचे नुकसान केल्याप्रकरणी निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंधेर यांनी केली.

दरम्यान पंजाब- हरियानाच्या खानौरी सीमेवर शेतकरी आंदोलक आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता तर बारा पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. शुभकरन सिंग (वय २१) असे मरण पावलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून तो भटिंडा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

पतियाळामध्ये पंधेर म्हणाले की, ‘हरियाना सुरक्षा दलाचे कर्मचारी हे पंजाबच्या हद्दीमध्ये प्रवेश करत असून खानौरी सीमेवर त्यांच्याकडून दडपशाही सुरू आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूप्रकरणी पंजाब सरकारने खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.’

पोलिसांवरही कारवाई होणार

‘शुभकरनसिंगला हुतात्म्याचा दर्जा बहाल करण्यात यावा,’ अशी मागणी शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी केली आहे. या युवा शेतकऱ्याच्या निधनावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शोक व्यक्त केला आहे. शवविच्छेदन पार पडल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल. या शेतकऱ्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे मान यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT