Breaking News  Sakal
देश

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; कार दरीत कोसळून चार महिलांसह ८ जणांचा मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार प्रवासी वाहन कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात झाला असून एक कार दरीत कोसळल्यानं ८ जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी किश्तवारमधील मारवाह इथं ही दुर्घटना घडली. स्थानिक पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. (Fatal accident in Jammu and Kashmir 8 people including 4 women died after car fell into valley)

पोलिसांनी सांगितलं की, अल्यासर इथून तातपानीकडे जाणाऱ्या टॅक्सीला मारवा इथं अपघात झाला. किश्तवारच्या पोलीस उपायुक्तांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, खोल दरीत कार कोसळल्यानं आठ लोकांचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता किश्तवार इथल्या मारवा इथं ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेची माहिती कळताच आपल्याला धक्काच बसला अशी प्रतिक्रिया जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी दिली आहे. या घटनेबद्दल त्यांनी शोकही व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT