देश

महिलेला बोट दाखवणे पडेल महाग, होऊ शकतो कारावास

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : एखाद्या महिलेला मधले बोट दाखवल्यास सक्त कारावास होऊ शकतो असा निकाल नुकताच न्यायालयाने दिला आहे. महिलेला मधले बोट दाखवणे हे महिलेसोबत असभ्य वर्तन करणे समजले जाईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश वसुंधरा आझाद यांनी याबद्दल निर्णय दिला असून 2014 सालच्या एका खटल्यासंदर्भात हा निर्णय देण्यात आला आहे. 

21 मे 2014 रोजी एका महिलेने तिच्या दिरावर मधले बोट दाखवत चूकीचे वर्तन केल्याचा उल्लेख करणारी याचिका दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर 2015 मध्ये आरोपीने पुन्हा एकदा न्यायलयात दाद मागत, आपण असे कोणतेही वर्तन केले नसून मालमत्तेच्या वादातून आपल्यावर हे आरोप करण्यात आल्याचे सांगितले.

दरम्यान पुढील तपासानंतर मात्र महिलेच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने मंगळवारी (ता. 17) आरोपी दीराला 3 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

त्यामुळे यापुढे कोणत्याही महिलेला मधले बोट दाखवणे एक गुन्हा समजला जाणार असून यान्वये तीन वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Energy Supply : भारतावर नवं मोठं संकट ! एलपीजीसह पेट्रोल- डिझेलवर होणार परिणाम; कृषी क्षेत्रालाही बसणार फटका

Latest Marathi News Live Update : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात आज 'कॉक्रोच जनता पार्टी'चे आंदोलन

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर जाहीर! पुणे, मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील ताजे भाव एका क्लिकमध्ये

China Pakistan partnership: चीनच्या मदतीने पाकिस्तानची अवकाशात झेप; भारतावर लक्ष ठेवण्यासाठी १६ महिन्यांत सहा उपग्रह प्रक्षेपित?, अवकाशातून राहणार नजर

Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा वाढली! १५ जुलैला १२ स्थानके सुरू होणार, पण पूर्ण मेट्रोसाठी २०२७ पर्यंत वाट पाहावी लागणार

SCROLL FOR NEXT