देश

भाजपचे ‘अब तक सत्तावन’

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ७० पैकी ५७ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. यात ११ उमेदवार अनुसूचित जातीचे असून, चार महिला उमेदवार आहेत. विजेंद्र गुप्ता यांच्यासह तिन्ही आमदारांना तिकिटे देण्यात आली आहेत. दिल्लीत भाजपसमोर आपचे मोठे आव्हान आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने २०१५ मध्ये आपटलेल्या २६ उमेदवारांना पुन्हा तिकिटे दिली आहेत. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण, तसेच खुद्द अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्लीतून कोण उभे राहणार, हे प्रश्‍न मात्र भाजपने अनुत्तरितच ठेवले आहे.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमोर पटपडगंजमधून रवी नेगी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर, दिल्लीचे श्‍याम जाजू व तरुण चुग यांच्या उपस्थितीत आज भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली. उर्वरित १३ उमेदवारही लवकरच जाहीर होतील, असे ते म्हणाले. दिल्लीत ८ फेब्रुवारीला मतदान व संसद अधिवेशन पूर्वार्धाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदींच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या मॅरेथॉन बैठकीत बहुतांश उमेदवारांची नावे निश्‍चित करण्यात आली. 

आपमधून आलेल्या कपिल मिश्रा यांच्यासारख्या मोजक्‍याच चेहऱ्यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले. मोजक्‍या चार महिला उमेदवारांत विभा गुप्ता, लता सोढी, शिखा राय व किरण वैद्य यांचा समावेश आहे. सर्वश्री गुप्ता (रोहिणी), जगदीश प्रधान (मुस्तफाबाद) व ओ. पी. शर्मा (विश्‍वासनगर) या तिन्ही आमदारांना आहे तेथेच कायम ठेवण्यात आले आहे. मात्र अकाली दल व इतर मित्रपक्षांना किती जागा देणार याबाबत भाजपने खुलासा केलेला नाही. 

भाजपचे प्रमुख उमेदवार
    विजेंद्र गुप्ता (रोहिणी)
    कपिल मिश्रा (मॉडेल टाउन)
    सुमनकुमार गुप्ता (चांदनी चौक)
    योगेंद्र चंदोलिया (करोल बाग)
    परवेश रतन (पटेलनगर)
    आशिष सूद (जनकपुरी)
    संजय सिंह (विकासपुरी)
    प्रद्युम्न राजपूत (द्वारका)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगलींचा कट? ‘मुंबईत झलक दिसली’; राज ठाकरेंचा खळबळजनक इशारा

Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video

Pune Bengaluru Highway: कारला आग लागली अन् महामार्ग ठप्प; आनेवाडीजवळ ५ किमी वाहनांच्या रांगा, अग्निशामक वाहनावर संताप

Marathi News Live Updates : पुण्यात शाळेत चोरी, चड्डी बनियन गँग सीसीटीव्हीत कैद

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

SCROLL FOR NEXT