first swarn dwar golden gate has been installed in the Ram Janmabhoomi Temple in Ayodhya see picture  
देश

Golden Gate: राम मंदिरात लागला पहिला सोन्याचा दरवाजा; जाणून घ्या काय आहे खास? पाहा फोटो

first swarn dwar golden gate has been installed in the Ram Janmabhoomi Temple : राम मंदिर सोहळ्याचा दिवस जसा जवळ येतोय तसा लोकांमध्ये उत्साह वाढत आहे. अयोध्येतील लोकांसाठी तर हा दिवाळीचाच सण आहेत. अशात राम मंदिराच्या निर्मितीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राम मंदिर सोहळ्याचा दिवस जसा जवळ येतोय तसा लोकांमध्ये उत्साह वाढत आहे. अयोध्येतील लोकांसाठी तर हा दिवाळीचाच सण आहेत. अशात राम मंदिराच्या निर्मितीबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. अयोध्येतील राम मंदिराला लागणाऱ्या सोन्याच्या दरवाजाचा पहिला फोटो समोर आला आहे. या दरवाज्यावर सुंदर अशी कलाकुसर करण्यात आली आहे. (first swarn dwar golden gate has been installed in the Ram Janmabhoomi Temple in Ayodhya see picture)

माहितीनुसार, दरवाजा १२ फूट उंच आणि ८ फूट लांब आहे. या दरवाज्याला पहिल्या मजल्यावर लावण्यात आले आहे. राम मंदिराला एकूण ४६ दरवाजे असणार आहेत. ज्यातील ४२ दरवाज्यांवर १०० किलो वजनाचा सोन्याचा स्तर चढवला जाणार आहे. पायऱ्यांच्या जवळ असणाऱ्या चार दरवाज्यांना सोने लावले जाणार नाही. येत्या तीन दिवसात अशाच प्रकारे आणखी १३ दरवाज्यांवर सोने लावले जाईल.

काय आहे खास?

राम मंदिराच्या सोन्याच्या दरवाजाचे फोटो समोर आलेत. यामध्ये दिसतंय की, मध्यभागी दोन हत्ती आहेत. लोकांचे स्वागत करणारे हे हत्ती आहे. दरवाजाच्या वरच्या भागात राजवाड्यासारखी आकृती दिसत आहे. याठिकाणी नोकरवर्ग हात जोडून उभा आहे. दरवाजाच्या तळाच्या भागात सुंदर कलाकुसर करण्यात आलीये.या दरवाज्यासाठी वापरण्यात आलेले लाकूड महाराष्ट्रातून मागवण्यात आले होते. दरवाजा कन्याकुमारीच्या कलाकारांनी घडवला आहे. १००० वर्षांपर्यंत हे दरवाजे खराब होणार नाहीत असं सांगितलं जातं.

राम मंदिर सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु

२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. अयोध्येतील या कार्यक्रमासाठी देश-विदेशातून जवळपास ८ हजार मान्यवरांना बोलवण्यात आले आहे. त्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. अतिशय भव्य असा हा सोहळा असणार आहे. हा दिवस ऐतिहासिक ठरेल यादृष्टीने श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट प्रयत्न करत आहे. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. तसेच रात्रीच्या वेळीच घराघरात दिवे लावण्यात येतील. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT