CJI Chandrachud  esakal
देश

CJI Chandrachud : 'या' चार वकिलांनी न्यायाधीश होण्यास दिला होता नकार; चंद्रचूड यांची ऑफर का फेटाळली? 'जज'पेक्षा जास्त प्रसिद्ध असलेले वकील...

मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी त्यांच्या 'सुप्रीम व्हिस्पर्स' या पुस्तकात याचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, माजी सरन्यायाधीश वायव्ही चंद्रचूड यांनी चार वकिलांची बैठक घेतली, त्यात त्यांनी वकिलांना न्यायाधीश होण्याची ऑफर दिली. परंतु वकिलांनी त्यांची ऑफर स्वीकारली नाही.

संतोष कानडे

नवी दिल्लीः भारताच्या न्यायालयीन इतिहासात असे अनेक वकील झालेत ज्यांनी न्यायाधीशांपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवली. विशेष म्हणजे जेव्हा त्यांना न्यायाधीश होण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी ती संधी नाकारली.

साधारण सत्तरच्या दशकामध्ये असे चार वकील होते ज्यांना देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्याची ऑफर दिली होती. परंतु चारही वकिलांनी सीजेआयची ऑफर नाकारली.

मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी त्यांच्या 'सुप्रीम व्हिस्पर्स' या पुस्तकात याचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, माजी सरन्यायाधीश वायव्ही चंद्रचूड यांनी चार वकिलांची बैठक घेतली, त्यात त्यांनी वकिलांना न्यायाधीश होण्याची ऑफर दिली. परंतु वकिलांनी त्यांची ऑफर स्वीकारली नाही.

अभिनव चंद्रचूड यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितले की, कमी पगारामुळे चारही वकिलांनी न्यायाधीशपदाची ऑफर नाकारली. हे चार वकील के. पारासरण, फली एस. नरिमन, ए.एन. काकर आणि के.के. वेणुगोपाल होते. माजी CJI YV चंद्रचूड यांना चारही वकिलांना थेट बारमधून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करायचे होते, परंतु चौघांनीही नकार दिला.

पुस्तकात पुढे म्हटलं की, माजी सरन्यायाधीश वाय.व्ही.चंद्रचूड यांनी चार वकिलांसोबत वैयक्तिक बैठका घेतल्या. न्यायमूर्ती पीएन भगवती आणि न्यायमूर्ती कृष्णा अय्यर यांसारख्या वरिष्ठ सहकाऱ्यांशीही त्यांनी त्यांना बोलायला लावले, पण चौघेही त्यांच्या मुद्द्यावर ठाम राहिले.

अभिनव चंद्रचूड पुढे म्हणतात, वकिलांनी ऑफर न स्वीकारण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावेळी न्यायाधीशांना खूप कमी पगार दिला जात होता. त्यांच्या आधी फली एस. नरीमन यांनी 38 वर्षांचे असतानाही कमी पगारामुळे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होण्याची ऑफर नाकारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT