Firing news in pune Sakal
देश

Video : वडिलांना मारहाण; बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाचा तरुणावर गोळीबार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - दिल्लीतील जहांगीरपुरी येथे एका अल्पवयीन मुलाने जावेद नावाच्या व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार केला. अल्पवयीन मुलासोबत त्याचे तीन मित्रही होते. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. (Minor boys Firing news in Marathi)

मिळालेल्या माहितीनुसार, सात महिन्यांपूर्वी जावेदने अल्पवयीन मुलाच्या वडिलांना मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलाने हा गोळीबार केल्याचं समोर आलं आहे.

व्हिडीओ फुटेजमध्ये, जावेद रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांसमोर बसलेला होता. त्याचवेळी चार मुले तिथे आले. अचानक एक मुलगा पुढे सरकला आणि त्याने जावेदवर गोळी झाडली. त्यानंतर चारही मुले पळून गेले. गोळी झाडल्यानंतर जावेद जागेवरून हलत देखील नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येते. बंदुकीची गोळी त्याला स्पर्श करून गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळेपर्यंत, चारही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र पोलिसांनी अल्पावधीतच सर्व आरोपींना अटक करून कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. तर गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जावेदने पोलिसांनी सांगितले की, तो त्याच्या भागातील एच-3 ब्लॉकजवळ बसलेला होता. त्याचवेळी आपल्या ओळखीचे तीन मुले तेथे आली. त्यातील एकाने आपल्यावर गोळीबार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT