Covid Vaccination for youth and old people 
देश

आजपासून सर्वांना मिळणार कोरोना लसीचा मोफत बूस्टर डोस

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत पुढील ७५ दिवसांसाठी ही मोफत लसीकरणाची मोहिम सुरु असणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सशुल्क असल्यानं बूस्टर डोस घेण्यात नागरिकांची उदासिनता तसेच वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांना पुढील ७५ दिवसांसाठी बूस्टर डोस मोफत केला आहे. याची काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून (शुक्रवार) बूस्टर डोस सर्वांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. (Free Covid booster dose for all adults from today)

सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर आजपासून कोरोनाचा बुस्टर डोस मोफत उपलब्ध असणार आहेत. पूर्वी दुसऱ्या डोसच्या ९० दिवसांनंतर अर्थात तीन महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जात होता. मात्र, आता या कालावधीत बदल झाला असून तो कमी करण्यात आला आहे. त्यामुळं आता बूस्टर डोस दुसऱ्या डोसनंतर ७५ दिवसांत अर्थात अडीच महिन्यांनंतर घेता येणार आहे.

कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संचालक आणि लसीकरण मोहिमेचे नोडल अधिकारी डॉ. ब्रिजय पानीग्रही यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, आजपासून आपण मोफत बूस्टर डोसला सुरुवात करत आहोत. पुढील ७५ दिवसांत अर्थात १५ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात आपण १८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत बूस्टर डोसची ही लसीकरण मोहिम राबवली जात आहे. त्यामुळं स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या पार्श्वभूमीवर येत्या ७५ दिवसांत मोफत संपूर्ण बूस्टर डोसचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दीष्ट सरकारनं समोर ठेवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT