Gandhi Family e sakal
देश

CRPF च्या महिला जवान पहिल्यांदाच VIP सुरक्षेत; शाह, गांधी कुटुंबीयांना संरक्षण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Minister Amit Shah), माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former Prime Minister Manmohan Singh) आणि गांधी कुटुंबीयांना (Gandhi Family) केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून (CRPF ) झेड-प्लस सुरक्षा पुरविण्यात येते. आता या तिन्ही कुटुंबीयांना सीआरपीएफच्या महिला जवानाकडून संरक्षण मिळणार आहे. यापूर्वी फक्त पुरुष कमांडोंचा समावेश होता. मात्र, आता व्हीआयपी सुरक्षेसाठी प्रथमच महिला जवान तैनात करण्यात येणार आहेत.

“आमच्या महिला कमांडोच्या पहिल्या तुकडीतील 32 महिला जवानांनी व्हीआयपी सुरक्षेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना १५ जानेवारीपर्यंत तैनात करण्यात येईल. आम्ही त्यांना व्हीआयपी सुरक्षा असलेल्या ठिकाणी तैनात करणार आहोत. फक्त 32 महिला लढाऊ असल्याने, प्रत्येकाला फक्त पाच किंवा सहा महिला कमांडो मिळतील. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. गरज असल्यास निवडणूक रॅलीदरम्यान व्हिआयपी महिलांना त्यांच्याद्वारे संरक्षण देण्यात येईल, असं सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याकडे महिला कमांडोकडून संरक्षण देण्याची ही पहिलीच वेळ नाही. जेव्हा त्यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) चे संरक्षण मिळत होते त्यावेळी देखील एसपीजी महिला कमांडोची एक छोटी तुकडी होती. त्यांच्याकडून या कुटुंबीयांना सुरक्षा प्रदान केली जात होती. गांधी आणि सिंह या कुटुंबीयांची नोव्हेंबर 2019 मध्ये एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.

व्हीआयपी सुरक्षा प्रदान करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटी गार्डने गेल्या २०१२ मध्ये २५ महिला जवानांचे दल तयार केले होते. यावेळी बहुजन समाज पक्षाच्या (BSP) सुप्रीमो मायावती आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या प्रमुख जे जयललिता यांच्या संरक्षण देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT