Rahul Gandhi 
देश

राहुल गांधींनी सांगितला हिंदू-हिंदुत्व यातील फरक; गांधी-गोडसेंचा दिला दाखला

जयपूरमध्ये पार पडली काँग्रेसची रॅली

Amit Ujagare (अमित उजागरे)

जयपूर : हिंदु आणि हिंदुत्ववादी याचा अर्थ काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी समजावून सांगाव लागला आहे. यासाठी त्यांनी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे या दोघांचा दाखला दिला आहे. जयपूर येथे रविवारी काँग्रेसची रॅली पार पडली, यामध्ये राहुल गांधी बोलत होते.

राहुल गांधी, "मला तुम्हाला हिंदू आणि हिंदुत्वातील फरक सांगायचा आहे. हिंदुंचा मार्ग हा सत्याचा मार्ग असतो आणि ते सत्यासाठी प्राण त्यागायलाही तयार असतात. महात्मा गांधी यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधात घालवलं, तर हिंदुत्ववादी गोडसेनं त्यांच्यावर तीन गोळ्या चालवल्या. भगवत् गीता हिंदुंना सत्य शोधण्यास सांगते तर दुसरीकडं हिंदुत्ववाद्यांना सत्याशी काही घेणदेणं नसतं ते केवळ सत्तेचे तहानलेले असतात. त्यांना भीती वाटत असल्यानं त्यांच्यामध्ये द्वेष ठासून भरलेला असतो. दरम्यान, सत्ताधारी मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, सन २०१४ पासून हिंदुत्ववादी सत्तेत आहेत तर हिंदू सत्तेबाहेर आहेत. ते (हिंदुत्ववादी) खोटे हिंदू आहेत."

नेते नव्हे तर उद्यागपती चालवताहेत देश

महागाईविरोधात काढलेल्या या रॅलीत बोलताना राहुल गांधी म्हणाले, ही रॅली महागाई आणि बेरोजगारीविरोधात आहे. आपण देशाची सध्याची स्थिती पाहत आहात. सध्या नेते देश चालवत नाहीएत तर तीन-चार उद्योगपती चालवताहेत.

सीडीएस बिपीन रावत यांना वाहिली श्रद्धांजली

दरम्यान, या रॅलीमध्ये नुकतेच हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू पावलेले सीडीएस बिपीन रावत यांच्या स्मरणार्थ मौन पाळण्यात आलं. या अपघातात रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर ८ लष्कराचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

CM Gram Sadak Yojana: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ग्रामीण रस्त्यांसाठी ६,४२९ कोटींचा निधी; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर...महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

SCROLL FOR NEXT