general upendra dwivedi takes charge as indian army Chief after general manoj pande retires marathi News  
देश

Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदींनी स्वीकारला लष्करप्रमुख पदाचा कार्यभार; मनोज पांडेंची घेतली जागा

१९८४ मध्ये जम्मू-काश्मीर रायफल्समध्ये सर्वप्रथम द्विवेदी यांची नियुक्ती झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाचे लष्करप्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी मावळते लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. लष्कर प्रमुख पदाचा कार्यभार हाती घेण्यापूर्वी जनरल द्विवेदी हे लष्कराच्या उपप्रमुख पदावर कार्यरत होते. २०२२ पासून त्यांच्याकडे लष्कराच्या उत्तर विभागाची (नॉदर्न कमांड) जबाबदारी होती. जनरल द्विवेदी हे देशाचे ३० वे लष्कर प्रमुख ठरले आहेत.

१९८४ मध्ये जम्मू-काश्मीर रायफल्समध्ये सर्वप्रथम द्विवेदी यांची नियुक्ती झाली होती. नॉदर्न कमांडमध्ये कमांडर म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. लष्करात सध्या आमूलाग्र बदल सुरू असून त्याच्या आधुनिकीकरणाचे​ही काम सुरू आहे. अशावेळी जनरल द्विवेदी यांनी लष्करप्रमुख पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. चाळीस वर्षांच्या कार्यकाळात द्विवेदी यांनी जम्मू-काश्मीर रायफल्स बटालियन,२६ सेक्टर आसाम रायफल्स ब्रिगेड, नाईन कोअर अशा विभागात काम केले आहे. सैनिक शाळा रिवा, नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि यूएस आर्मी वॉर कॉलेजमधून द्विवेदी यांनी शिक्षण पूर्ण केले होते.

दहशतवादाविरोधी मोहिमांचे नेतृत्व

नॉदर्न कमांडचे कमांडर म्हणून काम करीत असताना जनरल द्विवेदी यांनी दहशतवादाविरोधातील अनेक मोहिमांचे नेतृत्व केले आहे. चीन आणि पाकिस्तान पासून असलेल्या धोक्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. जनरल ​द्विवेदी यांच्यासह सैनिकी शिक्षण पूर्ण केलेल्या ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी मागील दोन महिन्यांपूर्वीच नौदलाच्या प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता. या दोघांचे सैनिकी शिक्षण रिवा येथे झाले आहे. दरम्यान लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सुब्रमणी यांचे शिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला तसेच भारतीय सैनिक अकादमी डेहराडून येथे झाले आहे. १९८५ मध्ये ते गढवाल रायफल्समध्ये सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT