amrindar singh 
देश

"गांधी कुटुंबियांपेक्षा वाढत्या लोकप्रियतेचा अमरिंदर यांना फटका"

पंजाबच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवरुन भाजपचा काँग्रेसवर निशाणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंजाबमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवरुन भाजपनं काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस हायकमांडच्या दबावामुळेच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. कारण अमरिंदर सिंग यांची लोकप्रियता गांधी कुटुंबियांपेक्षा अधिक वाढत होती, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

जोशी म्हणाले, "कॅप्टन अमरिंदर सिंग हे लोकप्रिय नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन काढण्यात आलं कारण त्यांची लोकप्रियता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापेक्षा वाढत होती." दरम्यान, भाजपनं उत्तराखंड, गुजरात आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले यावर काँग्रेसनं प्रश्न विचारले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जोशी म्हणाले, काँग्रेसचे लोकच गोंधळात अडकलेले आहेत त्यांमुळे त्यांच्या प्रश्नाला आम्ही महत्व देत नाही.

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यापार्श्वभूमीवर सहा महिने आधीच कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आलं आहे. दरम्यान, पंजाबमध्ये नवा मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे देण्यासाठी काँग्रेस कमिटीमध्ये ठराव संमत करण्यात आला आहे. अमरिंदर सिंग यांच्यानंतर नवा मुख्यमंत्री निवडताना दोन उपमुख्यमंत्री देखील नियुक्त करण्यात येण्याची शक्यता आहे, असंही सूत्रांकडून कळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT