Gujarat High Court esakal
देश

काय खावे हे ठरवणार का, उच्च न्यायालयाने अहमदाबाद पालिकेला फटकारले

रस्त्यावर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्यांविरोधात मोहिम उघडलेल्या अहमदाबाद महानगरपालिकेला गुजरात उच्च न्यायालयाने फटकारले आहे.

पीटीआय

अहमदाबाद : रस्त्यावर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्यांविरोधात मोहिम उघडलेल्या अहमदाबाद महानगरपालिकेला (AMC) गुजरात उच्च न्यायालयाने फटकारले आहे. शेवटी लोकांना घराबाहेर त्यांच्या आवडीचे पदार्थ खाण्यापासून कसे रोखले जाऊ शकते? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता.नऊ) २० हाॅकर्सच्या वतीने दाखल याचिका निकाली काढताना टिप्पणी केली. याचिकाकर्त्यांनी दावा केला एएमसीने नुकतेच अतिक्रमणाच्या विरोधात जी मोहिम चालवली त्यात हातगाड्यांवर मांसाहारी पदार्थ विकणाऱ्यांना लक्ष्य केले आहे. मात्र त्यास एएमसीने नकार दिला. याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायमूर्ती बिरेन वैष्णव यांनी अहमदाबाद महापालिकेला (Ahmedabad Municipal Corporation) विचारले, तुमची अडचण काय आहे? तुम्ही कसे निश्चित करु शकता की मी घराबाहेर काय खावे? तुम्ही ते खाण्यापासून कसे रोखू शकता जे त्यांना खायचे आहे. (Guajrat High Court)

अचानक सत्तेत बसलेल्यांना कस वाटते की हे करायला हवे? माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करुन म्हटले, की वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणालाही अधिकार नाही. याचिककर्ते म्हणाले, की भाजप नियंत्रित महापालिकेने अंडे आणि इतर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या हाॅकर्सवर कारवाई सुरु केली होती. याचिकाकर्त्यांचे वकील रोनिथ जाॅय यांनी एएमसीच्या धोरणाला कट्टरता असे म्हटले आहे. न्यायमूर्ती वैष्णव म्हणाले, मी काय खावे हे महापालिका आयुक्त ठरवणार का ? उद्या ते म्हणतील की ऊसाचा रस पिऊ नका. कारण त्याने मधुमेह होईल. किंवा म्हणतील की काॅफी शरीरासाठी हानिकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Students Protest : 'विरोधकांना संधी मिळाली की, ते वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न करतात'; जंतरमंतर आंदोलनावरुन छगन भुजबळ यांची टीका

Aurangabad Crime: छत्रपती संभाजीनगर हादरले! ९ वर्षांच्या मुलीचे रिक्षातून अपहरण, थरारक पाठलाग, रिक्षा नाल्यात फसली अन् काय घडलं..

Latest Marathi Update : 'नीट' आणि पेपरफुटीवर संसदेत सविस्तर चर्चा हवी; विरोधक चर्चेपासून पळ काढत आहेत : शिवराज सिंह चौहान

Mumbai Local Train: लोकलमधील गर्दी संपणार, दर २ मिनिटांनी ट्रेन धावणार; रेल्वे प्रशासनाचा नवा प्लॅन

Arijit Singh Student Protest : 'माझी गाणी डिलीट करा, माझं अस्तित्व विसरा, पण स्टुडंट प्रोटेस्टला माझा पाठींबा राहणार! अरिजीत सिंहचे वक्तव्य व्हायरल

SCROLL FOR NEXT