जिग्नेश मेवानी सकाळ
देश

आमदार जिग्नेश मेवाणींना दिलासा, PM मोदींवर ट्विटप्रकरणी जामीन मंजूर

पंतप्रधानांविरोधात ट्विट केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी मेवाणी यांना बुधवारी गुजरातमधून अटक केली होती.

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी : गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाम न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या ट्विटसाठी जामीन मंजूर केला आहे. पंतप्रधानांविरोधात ट्विट केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी मेवाणी यांना बुधवारी गुजरातमधून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने रविवारी मेवाणी यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मेवाणींची तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर रविवारी सायंकाळी उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. (Gujarat MLA Jignesh Mevani Granted Bail)

काँग्रेस समर्थित अपक्ष आमदार मेवाणी यांना बुधवारी रात्री गुजरातमधील पालनपूर येथून अटक करण्यात आली, त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या कथित ट्विटबद्दल आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत कोक्राझार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. एफआयआरनुसार, त्यांनी कथितरित्या एक ट्विट केले होते, ज्यात दावा केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 'गोडसेला देव मानतात'. असे म्हटले होते.

दरम्यान, अटकेनंतर मेवाणींच्या सुटकेच्या मागणीसाठी काँग्रेस आमदार आणि नेत्यांनीही निदर्शने केली. तसेच AIUDF आणि CPI(M) सह इतर विरोधी पक्षांनी देखील पोलीस कोठडीत मेवाणींची भेट घेतली होती आणि त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी जिग्नेश मेवाणी यांची आसाम पोलिसांनी केलेली अटक ‘अलोकतांत्रिक’ आणि ‘संवैधानिक’ असल्याचे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT