Corona test File photo
देश

लस घेतलेल्यांना राज्यातील प्रवेशावेळी RTPCR रिपोर्टमधून सूट

कार्तिक पुजारी

देशात लसीकरणाने वेग घेतलेला असून आतापर्यंत जवळपास 60 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे.

नवी दिल्ली- देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरली आहे, तरी तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. देशात लसीकरणाने वेग घेतलेला असून आतापर्यंत जवळपास 60 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचना केल्यात की, ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना राज्यातील प्रवेशादरम्यान निगेटिव्ह RTPCR रिपोर्ट मागू नये. असे असले तरी दुसऱ्या राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनावरील लशीचा दुसरा डोस घेऊन 15 दिवस उलटलेले असणे अनिवार्य आहेत. (National Latest news)

आरोग्य मंत्रालयाने राज्यांसाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. यानुसार, दुसऱ्या राज्यातून आलेल्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तर त्यांना निगेटिव्ह RTPCR रिपोर्ट दाखवणे बंधनकारक नाही. पण, त्यांनी दुसरा लस घेऊन 15 दिवस झालेले असणे आवश्यक आहे. याशिवाय दोन डोस घेतलेल्या नागरिकांची राज्यातील प्रवेशावेळी RAT टेस्ट न करण्याच्या सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लस घेतलेल्यांनी आपल्याजवळ Co-WIN पोर्टलवरुन डाऊनलोड केलेलं सर्टिफिकेट ठेवणे आवश्यक आहे. हवाईमार्ग, रस्त्याने, रेल्वेने किंवा जलमार्गाने देशांतर्गत प्रवास करताना कोणतेही निर्बंध असणार नाहीत. नुकतेच झारखंड, छत्तीसगड आणि त्रिपूरा या राज्यांनी दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RTPCR रिपोर्ट दाखवणे बंधनकारक केले होते. पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनी काही विशिष्ठ ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांसाठी काही निर्बंध आणले होते. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाकडून डोमेस्टिक प्रवासासाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास यात बदल केला जाऊ शकतो. दरम्यान, देशात लसीकरण मोहिमेने गती घेतली आहे. देशात 16 जानेवारीला लसीकरण सुरु करण्यात आले होते. आतापर्यंत 60 कोटी लोकांना किमान एक डोस मिळालाय. दररोज 50 लाखांपेक्षा अधिक लोकांना लस दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांचं वजन ९ किलो घटलं, उपोषणाचे अवयवांवर गंभीर परिणाम; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिला इशारा

Pandharpur VIP Darshan : पहिल्याच दिवशी VIP दर्शन बंदीचा फज्जा! मुनगंटीवारांना ठेवलं वेटिंगवर, गुलाबराव पाटलांना दिलं तात्काळ दर्शन; महायुतीच्या नेत्यांमध्येच दुजाभाव?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात व्हिआयपी दर्शन घेतल्यास गुन्हा दाखल करणार

डॉक्टर पतीला संपवलं, ८ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात; शेजारी डॉक्टर पत्नी मोबाईल बघत बसलेली

'आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला' उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT