देश

अंतिम वर्षांच्या परिक्षेचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी...

संजय घारपुरे

नवी दिल्ली : पदवी अंतिम वर्षाची परिक्षा घेण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाबद्दल आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. देशभरातील 31 विद्यार्थ्यांनी याबाबत याचिका सादर केली आहे. हे विद्यार्थी तेरा राज्य आणि एका केंद्रशासीत प्रदेशातील आहेत. 

विशेष म्हणजे याचिका सादर केलेल्या 31 विद्यार्थ्यांपैकी एकास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी अंतिम वर्षाची परिक्षा रद्द करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. न्या. एल नागेश्वर राव आणि न्या. हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील विद्यापीठांना 30 सप्टेंबरपर्यंत परिक्षा पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याविरोधात ही याचिका सादर करण्यात आली आहे. अंतिम वर्षाच्या परिक्षेचे निकाल अंतर्गत तपासणीद्वारे अथवा यापूर्वीच्या परिक्षांच्या निकालांच्या आधारे निश्चित करण्यात यावेत तसेच विद्यार्थ्यांना अंतिम निकाल पत्र 31 जुलैपर्यंत देण्यातत यावे अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आले आहे. अनुभा श्रीवास्तव सहाय या विद्यार्थ्यांची बाजू मांडणार आहेत. 

अंतिम वर्षाच्या परिक्षेसाठी सीबीएसईचे मॉडेल अमलात आणण्यात यावे. अंतर्गत तपासणी अथवा यापूर्वीच्या परिक्षांच्या आधारे देण्यात आलेल्या गुणांवर जे विद्यार्थी समाधानी नसतील त्यांची परिक्षा घेण्यात यावी. या याचिकेबरोबरच अमित दुबे या विद्यार्थ्याने सर्वोच्च न्यायालयास पाठवलेल्या पत्राचेही याचिकेत रुपांतर करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील विधी शाखेत अखेरच्या वर्षात अमित शिकत आहे. त्यानेही न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या शिफारसींबाबत लक्ष वेधले आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर, धाराशीव नामांतराला विरोध करणारी स्थानिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Met Gala 2024 : किम कार्देशीयनने मेट गालामध्ये लावली चक्क स्वेटरमध्ये हजेरी ; फॅन्स झाले नाराज

Sharad Pawar: विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?, इंडिया आघाडी म्हणजे १९७७ मधला जनता पक्ष, शरद पवार काय म्हणाले?

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT