Jharkhand CM 
देश

Hemant Soren Arrested: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक; पदाचा दिला राजीनामा

Hemant Soren ED arrested: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना त्यांच्या घरुन ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीने त्यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे

कार्तिक पुजारी

रांची- झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना त्यांच्या घरुन ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीने त्यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच त्यांना कधीही अटक होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. (Hemant Soren ED arrested Jharkhand CM from his residence after interrogation)

सक्तवसुली संचालनालयाने दीर्घ चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना ताब्यात घेतले आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीच्या टीमसोबत बुधवारी रात्री राजभवन गाठले. याठिकाणी त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. या काळात चंपाई सोरेन यांना विधिमंडळ पक्षाचा नेते म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे चंपाई सोरेने हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होतील.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यपालांनी हेमंत सोरेन यांचा राजीनामा स्वीकार केला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे खासदार महुआ माजी यांनी माहिती देताना सांगितलं की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात येईल. त्यांच्याकडे पुरुसे संख्याबळ आहे. दरम्यान, हेमंत सोरेन यांनी मंगळवारी आमदारांची बैठक घेतली होती. त्यावेळी चंपाई सोरेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Update: गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम बदलला! नियम बदलल्यानंतर दरातही बदल? महाराष्ट्रात LPG सिलेंडर आता कितीला?

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

SCROLL FOR NEXT