देश

किन्नौर : दरड दुर्घटनेत १० ठार, १४ जणांना वाचवण्यात यश

नामदेव कुंभार

हिमाचल प्रदेशमधील किन्नौरमध्ये तळीये गावाची पुनरावृत्ती झाली आहे. निगुलसेरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५ वर दरड कोसळी असून ढिगाऱ्याखाली प्रवाशांनी भरलेली बस आणि काही छोटी वाहनं अडकली होती. या दुर्घटनेत आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून इतर १४ जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बसमध्ये 35 ते 40 प्रवाशी होते. हिमाचल प्रदेश रोड ट्रान्सपोर्टची बस या ढिगाऱ्याखाली अडकली. हरिद्वारवरुन बस निघाली होती. त्यावेळी निगुलसेरी जवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत बस चालक बचावला आहे. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर बचावकार्यासाठी ITBP चं पथक रवाना झालं आहे.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही या घटेनला दुजोरा दिला आहे. तसेच NDRF पथकालाही पाचारणं केल्याचं त्यांनी सांगितलं. दरडीखाली एक बस आणि कार आल्याची माहिती मिळाल्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT