Supreme Court  esakal
देश

MLA Disqualification Case: बंडखोरांना दणका! 6 काँग्रेस आमदारांच्या निलंबन स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

Himachal Pradesh Congress MLA: या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या बंडखोर आमदरांनी या निलंबनावर स्थिगिती आणण्याची मागणी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Himachal Pradesh Congress MLA Disqualification Case:

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 6 आमदारांचे हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी निलंबन केले होते.

या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या बंडखोर आमदरांनी निलंबनावर स्थिगिती आणण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दिपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठाणिया यांना नोटीस पाठवत या प्रकरणी त्यांचे मत मागविले आहे.

यावेळी खंडपीठाने असेही सांगितले की, जोपर्यंत हे प्रकरण प्रलंबित आहे, तोपर्यंत काँग्रेसच्या या 6 बंडखोर आमदारांना विधानसभेच्या कामकाजात आणि कोणत्याही प्रकारच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

या प्रकरणी आता पुढची सुनावनी 6 मे रोजी ठेवली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने या सहा जागांवर पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 7 मे रोजी होणार आहे.

सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजिंदर राणा, इंदर दत्त लखनपाल, चेतन्या शर्मा आणि देविंदर कुमार भुट्टो या सहा बंडखोर आमदारांना 29 फेब्रुवारी रोजी सभागृहात निलंबित करण्यात आले होते.

या बंडखोर आमदारांनी कट मोशन आणि बजेट दरम्यान हिमाचल सरकारच्या बाजूने मतदान करण्याच्या काँग्रेसच्या व्हिपला झुगारले होते.

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेनंतर सभागृहाचे प्रभावी संख्याबळ ६८ वरून ६२ वर आले आहे, तर काँग्रेसच्या आमदारांची संख्या ४० वरून ३४ वर घसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

US Iran War: 'अचानक मृत्यूसाठी तयार राहा...'; लिंडसे ग्रॅहम यांच्या निधनानंतर इराणचा ट्रम्प यांना इशारा, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलं

INDW vs ENGW TEST: चक दे इंडिया! भारतीय मुलींचा 'Lords' वर ऐतिहासिक विजय! कसोटीतील इंग्लंडची सर्वात मोठी हार...

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी सर्व आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवली

Bloating Hidden Health Conditions: दूध-ग्लूटेन बंद करूनही पोट फुगतंय? डॉ. सेठी सांगतात, 'हे' ४ आजार असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT