Tamil Nadu CM MK Stalin Criticism central govt 
देश

भाषेचे आणखी एक युद्ध लादू नका ; एम. के.स्टॅलिन

‘हिंदीला मातेचे दूध, तर इतर भाषांना विष पाजण्याचा प्रकार’

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : हिंदी भाषा वापरण्याच्या शिफारशीवरून तमिळनाडू आणि केंद्र सरकार पुन्हा आमनेसामने आले आहेत. आयआयटी, आयआयएम आणि केंद्रीय विद्यापीठांमध्ये सूचनांचे माध्यम म्हणून हिंदीची शिफारस झाल्याबद्दल तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी कडाडून टीका केली. हिंदीची सक्ती करून भाषेचे आणखी एक युद्ध लादू नका, अशा इशाराही त्यांनी दिला.

अधिकृत भाषेसाठीच्या संसदीय समितीने ही शिफारस केली आहे. या समितीचा अहवाल केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला आहे. ‘देशातील २२ अधिकृत भाषांच्या यादीत आणखी भर घालण्याची मागणी लोक करीत असताना अशा अहवालाची गरजच काय,‘ असा सवाल स्टॅलिन यांनी केला. केंद्र सरकारच्या पदांसाठीच्या स्पर्धा परिक्षांमधून इंग्लिश वगळण्याची शिफारस का करण्यात आली असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

भाजपचा उल्लेख न करता ते म्हणाले की, संसदेत ‘भारत माता की जय'' म्हटले जाणे, हे एका राजकीय पक्षाचे घोषवाक्य बनविणे म्हणजे हिंदीला मातेचे दूध पाजणे, तर इतर भाषांना विष देण्यासारखे आहे. हे भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहे. शहा यांनी १६ सप्टेंबर रोजी ‘हिंदी दिवसा‘निमित्त केलेल्या विधानावर स्टॅलिन यांनी आक्षेप घेतला होता. हिंदी हीच अधिकृत भाषा असून आपल्या नेतृत्वाखालील समिती शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदीची सक्ती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

याचा उल्लेख करून स्टॅलिन म्हणाले की, ‘जी गोष्ट व्यवहार्य नाही ती लादण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हिंदी भाषकांना अव्वल दर्जाचे, तर बिगरहिंदी भाषकांना दुय्यम दर्जाचे नागरिक नागरिक संबोधण्याचा प्रकार आहे. जे आपल्या मातृभाषेची प्रशंसा करतात ते असा प्रकार सहन करणार नाहीत. विविधतेत एकता बघणाऱ्या भारतात इतर भाषांना समान वर्तणूक मिळायला हवी. सरकारसाठी सर्वच भाषा अधिकृत बनविल्या जाव्यात.’

मातृभाषा नामक अग्नीचा भडका उडेल असे काही करू नका. भाजप एक देश-एक भाषा-एक अन्न-एक संस्कृती हे तत्त्व लादण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भारतीय संघराज्याचे नुकसान होईल.

- एम. के. स्टॅलिन, तमिळनाडूचे मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

SCROLL FOR NEXT