Historian Irfan Habib said, Break the Red Fort-Taj Mahal Historian Irfan Habib said, Break the Red Fort-Taj Mahal
देश

इतिहासकार इरफान हबीब म्हणतात; ...तर लाल किल्ला-ताजमहाल तोडून बघा

सकाळ डिजिटल टीम

मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या हे इतिहासाने कधीच नाकारले नाही. या सर्व गोष्टींची इतिहासात नोंद आहेत. जे दावे केले जात आहेत ते पहिल्यांदाच कळत आहेत. हे सर्व बनावट आहे. एकदा संपूर्ण बांधकाम पाडले पाहिजे. सर्व काही बाहेर येईल. इतका वाद घालण्याची गरज नाही, असे ज्ञानवापी व कुतूब मीनारवर सुरू असलेल्या वादावर लेखक आणि इतिहासकार एस इरफान हबीब आज तकशी बोलताना म्हणाले. (Historian Irfan Habib said, Break the Red Fort-Taj Mahal)

सर्व काही पहिल्यांदाच सांगितले जात आहे आणि माहीत आहे हा दावा खोटा आहे. मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्याचे पुरावे इतिहासकारांना मिळाले आहेत. जर आपण इतिहासात गेलो तर औरंगजेबाचे अनेक फर्मान आहेत ज्यात इतिहासकारांनी असेही लिहिले आहे की मंदिरे पाडण्यात आली आणि तिथे मशिदी बांधल्या गेल्या. मंदिरे का पाडली? त्याचाही एक वेगळा इतिहास आहे, असेही इरफान हबीब (Historian Irfan Habib) म्हणाले.

ते शिवलिंग कसे असू शकते. ४०० वर्षांपासून मशीद सुरू असताना ते कसे राहिले. मुस्लिमांना हवे असते तर ते ते संपवू शकले असते. म्हणजेच मुस्लिमांनी त्याचा खूप आदर केला आणि सांभाळले. ते शिवलिंग नाही. ते फक्त एक कारंजा आहे. मोठ्या मशिदींमध्ये सर्वत्र कारंजे आढळतील. मशिदीमध्ये वुजूसाठी एक जागा बनवली आहे. सुशोभीकरणासाठी कारंजे बसवले आहेत, असेही इरफान हबीब म्हणाले. त्या काळात अनेक मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या हे मान्य आहे. कारण, औरंगजेब अधिकार दाखवण्यासाठी मंदिर तोडायचा आणि मशीद बांधायचा, असेही ते म्हणाले.

कुतूब मीनारचा (Qutub Minar) इतिहास कुतूब मिनार स्वतः सांगतो आणि त्यावर सर्व काही लिहिलेले आहे. हे मंदिरांच्या अवशेषांपासून बनलेले आहे. कोणाच्या खाली काय आहे कोणास ठाऊक? जामा मशिदीखाली काहीतरी असल्याचे सांगितले जात आहे. आता अशा सर्व संरचना नष्ट करा. ताजमहाल व लाल किल्ला नष्ट करा जामा मशीद पाडा आणि बाहेर काढा आणि बघा जे मिळेल ते समोर येईल, असेही इरफान हबीब (Historian Irfan Habib) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT