Hyderabad Crime News esakal
देश

Crime News : शाळेत पॉर्न व्हिडिओ बघणाऱ्या 5 विद्यार्थ्यांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुलांना पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय होती. शाळा सुटल्यानंतर ते असे व्हिडिओ पाहायचे.

सकाळ डिजिटल टीम

मुलांना पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय होती. शाळा सुटल्यानंतर ते असे व्हिडिओ पाहायचे.

हैदराबाद : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी इयत्ता 9 वी आणि दहावीत शिकणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांना हयातनगर पोलिसांनी (Hayathnagar Police) मंगळवारी अटक केली. ही घटना ऑगस्टमध्ये घडली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर सोमवारी तक्रार दाखल केली.

पाच मुलांपैकी तीनजण 15 वर्षांचे आहेत. एकजण दहावीच्या वर्गातील विद्यार्थी आहे, तर इतर दोघे 14 वर्षांचे आहेत. पीडित मुलगी 17 वर्षांची असून ती दहावीची विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी मुलांना पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय होती. शाळा सुटल्यानंतर अनेकदा ते त्यांच्या मोबाईलवर असे व्हिडिओ पाहायचे. ही सर्व रोजंदारी मजुरांची मुलं आहेत. पीडित मुलगी या मुलांना ओळखत होती. तिच्यावर ऑगस्ट महिन्यात 10 दिवसांच्या कालावधीत दोनदा अत्याचार झाला आहे. या दोन्ही प्रसंगांचं मुलांनी मोबाईलवर चित्रीकरण केलं, असं पोलीस म्हणाले.

मुलांनी मैत्रीचा गैरफायदा घेत घरी कोणी नसताना मुलीचं लैंगिक शोषण केलं. त्यांच्यापैकी एकानं हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. मुलीनं सांगितलं की, 'त्यांनी व्हिडिओद्वारे मला ब्लॅकमेल केलं आणि 10 दिवसांनी पुन्हा माझं लैंगिक शोषण केलं.' मुलांनी व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडितेच्या कुटुंबीयांना घटनेचा व्हिडिओ समजल्यानंतर मुलीनं तिच्या पालकांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडं जाऊन पाच मुलांविरुद्ध तक्रार दाखल केली, असं एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं.

पालकांची तक्रार पोलिसांकडं आल्यानंतर लगेचच या मुलांना पकडण्यात आलं. त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं असून पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 376 DA (सामूहिक बलात्कार) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT