ICICI Bank  
देश

ICICI बँकेच्या ऑनलाईन बँकिंग सेवा ठप्प; ग्राहक वैतागले!

युजर्सने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या ICICI बँकेची ऑनलाईन सेवा तांत्रिक बिघाडामुळे कोलमडली आहे. बँकेची नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा बंद झाल्याने ग्राहक वैतागले आहेत. त्यांनी सोशल मीडियामध्ये ट्विट करुन सेवा बंद असल्याची माहिती दिली आहे. काही ग्राहकांना युपीआय व्यवहार करतानाही अडचणी येत आहेत. काल रात्रीपासून ही सेवा ठप्प झाली असून अद्यापही सुरु झालेली नाही. दरम्यान, नक्की कोणत्या कारणामुळं ही सेवा बंद पडली आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

ICICI बँकेचे ग्राहक अनुज पंत यांनी ट्विटरवर सकाळी पोस्ट करुन याची माहिती दिली. त्यांनी बँकेच्या पेजचा एरर येत असलेला स्क्रीनशॉट शेअर केला होता. तसेच म्हटलं की, बँकेच्या ऑनलाईन सेवा सध्या तात्पुरती बंद दाखवत आहे. तसेच बँकेला त्यांनी विचारणा केली की, तुमच्या सर्व ऑनलाईन सेवा ठप्प झालेल्या दिसत आहेत. मोबाईल अॅपवर आम्हाला लॉगिन करता येत नाहीए तसेच डेस्कटॉप साईटवरही लॉगिन करण्यात अडचण येत आहे. कधीपर्यंत सेवा पूर्ववत होईल?

ICICI बँकेची ऑनलाईन सेवा ठप्प झाल्याने त्याचा बँकेच्या किती ग्राहकांवर थेट परिणाम होईल हे अद्याप कळू शकलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT