crime news 
देश

IIT BHUच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी तिघांना अटक, राजकीय पक्षाशी कनेक्शन

तिघेही आरोपी चेतगंजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्याचे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावेळी त्यांच्यावर संशयित म्हणून आरोप करण्यात आले होते.

Sandip Kapde

Crime News: आयआयटी बीएचयूच्या कॅम्पसमध्ये असलेल्या कर्मणवीर बाबा मंदिराजवळ एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला ही घटना घडली होती.

कुणाल पांडे, बाजरडिहा येथील जीवधीपूर येथील रहिवासी आनंद, सक्षम पटेल अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे खळबळ माजली होती. तिन्ही आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. हे तिघेही गेल्या निवडणुकीत भाजप आयटी सेलमध्ये सहभागी होते.

नेमकं काय घडलं होतं -

१ नोव्हेंबरला रात्री दिडच्या सुमारास विद्यार्थिनी आयआयटी बिएचयू मधील न्यू गर्ल्स हॉस्टेलमधून फिरायला निघाली होती. यावेळी तिला गांधी स्मृती चौकात एक मित्र भेटला. त्यानंतर दोघे कर्मनवीर बाबा मंदिराजवळ पोहोचले. तेव्हा बुलेटस्वार तीन तरुण मागूण आले. त्यांनी विद्यार्थिनीच्या मित्राला धमकावले. धमकी देऊन त्याला पळवून लावले.

त्यानंतर तीन नराधमांनी विद्यार्थिनीचे तोंड दाबले आणि तिला कोपऱ्यात घेऊन गेले. तिचे कपडे काढले आणि अत्याचार केले. आरडाओरड केल्यास विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकीही दिली. तिचा फोनही हिसकावून घेतला. (Latest Marathi News)

घटनेच्या दुसऱ्या आरोपी कॅमेऱ्यात दिसले-

घटनेच्या दुसऱ्या दिवशी हे तिघेही चेतगंजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्याचे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावेळी त्यांच्यावर संशयित म्हणून आरोप करण्यात आले होते. परंतु कोणतीही पुष्टी झाली नव्हती. दरम्यान पोलिसांनी खातरजमा करून अटक केली आहे. (Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT