देश

IMA च्या तब्बल 264 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू; राज्यातील धक्कादायक आकडेवारीही आली समोर

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना योद्धाही मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह होत आहेत. 21 ऑगस्टपर्यंत राज्यात एक हजारांहून अधिक डॉक्टर्स पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील 1 हजार 953 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. 

यात देशात आयएमएच्या 264 डॉक्टरांचा मृत्यू झाला असुन यातील 17 डॉक्टर राज्यातील आहेत. राज्यात 35 जिल्हे आणि 27 महापालिका क्षेत्र आहेत. कोरोना झालेले डॉक्टर हे सरकारी - पालिका आणि खासगी या सर्वच क्षेत्रातील असुन मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर आणि नाशिक मधील आहेत. आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, 1,700 शाखा असुन या सर्व शाखांतील मिळुन 264 आयएमए डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. 

21 ऑगस्टपर्यंत 1 हजार 953 डॉक्टर कोरोनाग्रस्त झाले आहेत. यातील 890 डॉक्टर स्वतंत्र प्रॅक्टिस करणारे, 767 डॉक्टर निवासी, तर 296 डॉक्टर हाऊस सर्जन आहेत. दरम्यान, डॉक्टरांना कोरोनाची लागण होऊ नये आणि त्यातून त्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले आहे. 

कम्युनिटी हेल्थ डीपार्टमेंट कडून ही आकडेवारी गोळा केली जाते. संपुर्ण राज्यातून आम्हाला ही काही रिपोर्ट येत आहेत. निवासी डॉक्टर्स पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक आहे. शिवाय, मृत्यू दर ही अधिक आहे. 8 टक्के डॉक्टरांचा मृत्यू दर आहे. डॉक्टर थेट रुग्णांच्या संपर्कात येत आहेत. झोपडपट्टी परिसरात 57 टक्के लोकांच्या शरीरात अँटीबाॅडीज तयार झालेल्या आहेत. हे लोक ही डॉक्टरांना संसर्ग पसरवू शकतात. त्यामुळे, सर्व डॉक्टरांनी एन 95 मास्क, फेस शील्ड घातले पाहिजेत. ज्यामुळे त्यांना संसर्गापासून वाचण्यास मदत होईल. 

डॉ. शिवकुमार उत्तुरे,
अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT