Lok Sabha Election Esakal
देश

Lok Sabha Election: शरद पवार गटाच्या विरोधात चक्क काँग्रेसचे उमेदवार? अजित पवारांच्या एंट्रीमुळे तिरंगी लढत

Lok Sabha Election: राज्यात महायुती(राष्ट्रवादी(अजित पवार गट), भाजप, शिवसेना शिंदे गट) विरूध्द महाविकास आघाडी(काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट) अशी लढत असणार आहे. तर महाराष्ट्रात असणारे मित्रपक्ष हे लक्षद्वीपमध्ये एकमेकांसमोर उभे असणार आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Lok Sabha Election: देशभरात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. देशातील सर्वच छोटे मोठे पक्ष उमेदवारांची घोषणा करत आहेत. जागावाटप, सभा, दौरे, पक्षप्रवेश यांना वेग आला आहे. अशातच महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात दोन पक्ष पुटले त्यांचा परिणाम अद्यापही दिसून येत आहे. राज्यात महायुती(राष्ट्रवादी(अजित पवार गट), भाजप, शिवसेना शिंदे गट) विरूध्द महाविकास आघाडी(काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट) अशी लढत असणार आहे. तर महाराष्ट्रात असणारे मित्रपक्ष हे लक्षद्वीपमध्ये एकमेकांसमोर उभे असणार आहेत.

लक्षद्वीपमध्ये लोकसभेला तिरंगी लढत दिसून येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोहम्मद फैजल तसेच काँग्रेस उमेदवार अब्दुल हमीद यांच्यासोबतच अजित दादा गटाचा उमेदवार असणार आहे. अजित दादा गटाकडून युसुफ टीपी यांना उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोहम्मद फैजल उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कोणता पक्ष बाजी मारणार याकडे महाराष्ट्राचही लक्ष असणार आहे.

लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीचे मोहम्मद फैझल हे खासदार आहेत. पक्षातील फुटीनंतर त्यांनी शरद पवारांना साथ दिली होती. हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल स्थानिक न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा ठोठावल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने गेल्या वर्षां फैझल यांना खासदार म्हणून अपात्र घोषित केले होते. केरळ उच्च न्यायालयाने खासदार फैझल यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यावरही लोकसभा अध्यक्षांनी सुमारे दोन महिने त्यांची अपात्रता रद्द करण्याचे टाळले होते. फैझल यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी तेव्हा भाजपने केली होती.

दरम्यान राज्यात एकत्रित लढणारे काँग्रेस आणि शरद पवार गट यांचे उमेदवार लक्षद्वीपमध्ये आमने-सामने येणार आहेत. लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान या ठिकाणी होणारी निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT