Crime in Madhya Pradesh esakal
देश

Crime News : आधी चार बायका सोडून गेल्या; पाचवीने वैतागून प्रायव्हेट पार्ट कापला

सकाळ डिजिटल टीम

Crime in Madhya Pradesh : मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. उर्ती गावातील एका महिलेने आपल्या पतीचा खून करुन त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

ही घटना आज उघड झाली असली तरी २१ फेब्रुवारी रोजी पत्नीने हे कांड केलं आहे. पोलिसांना मृतदेहाच्या गळ्यावर जखमा आढळून आल्या आहेत.

कोतवाली ठाण्याचे प्रभारी अरुण पांडेय यांनी सांगितलं की, मृताची पत्नी कंचन गुर्जरने ठाण्यात तक्रार देऊन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी मृताच्या अनेक नातेवाईकांसह संशयितांची चौकशी केली आहे.

हेही वाचाः बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

याच चौकशीदरम्यान पोलिसांनी मृताच्या पत्नीचीही चौकशी केली. पोलिसांनी कठोरपणे तिच्याकडून माहिती घेतली असता पूर्ण घटनेचा खुलासा झाला. मृत बीरेंद्र गुर्जर याची पत्नी कांचन हिने खूनाचा खुलासा करतांना सांगितलं की, तिचा पती नशेखोर होता. नशेच्या आहारी जात तो तिच्यावर अत्याचार करायचा.

त्यामुळे वैतागून कांचनने पतीला मारण्याचा प्लान केला. २१ फेब्रुवारी रोजी रात्री पती बीरेंद्रच्या जेवणात झोपेच्या २० गोळ्या मिसळल्या. त्यानंतर तो जेव्हा झोपेत होते तेव्हा तिने कुऱ्हाडीने त्याच्या गळ्यावर वार केले. नंतर त्याचं गुप्तांगावर एक वार करत त्याचा जीव घेतला.

त्यानंतर तिने मृतदेहाला कपड्यात गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिलं. एवढंच नाही तर पुरावे मिटवण्यासाठी तिने त्याचे कपडे आणि चपला जाळल्या. कांचन ही बीरेंद्रची पाचवी बायको होती. यापूर्वी त्याच्या चार बायका त्याला त्रासाला वैतागून सोडून गेल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT