Independence Day  esakal
देश

Independence Day : 2 कोटी दीदींना लखपती बनवण्याचे लक्ष्य, स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदींचा महिला शक्तीचा जागर

भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी महिला शक्तीचा जागर करत त्याविषयीच्या योजनांची केली घोषणा.

धनश्री भावसार-बगाडे

Women Empowerment By PM Narendra Modi In Marathi:

भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष पूर्ण झाले असून आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. या निमित्त लाल किल्ल्यावरून जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला शक्तीचा जागर केला. यावेळी देशातील महिला ताकदीविषयी सांगत काही योजनांविषयीदेखील जाहिर केले.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दीष्टही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

आपल्या भाषणात महिला शक्तीचा जागर करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज भारत अभिमानाने सांगू शकतो की सर्वाधिक महिला वैमानिक भारतात आहेत. 2 कोटी करोडपती दीदींचे टार्गेट घेऊन आम्ही काम करत आहोत. महिला शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करत आहोत."

भारताला पुढे नेण्यासाठी एक अतिरीक्त शक्तीची मदत होणार आहे. ती म्हणजे देशाची महिला शक्ती आहे. संपूर्ण जगातील सर्वाधिक महिला वैमानिक भारतात आहे. चांद्रयान असो किंवा चांद्र मोहिम यातही महिला वैज्ञानिकांचे योगदान मोठे आहे. नारी शक्तीला आर्थिक सक्षमतेला प्रोत्साहन देत आहोत. जी २० मध्येही सर्व जगाने याला मान्यता देत कौतुक केले आहे. याला पाठबळही देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

SCROLL FOR NEXT