ANI
देश

देशात तिसऱ्या लाटेची भीती; कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

सकाळ डिजिटल टीम

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. बुधवारी दिवसभरात 38 हजार 353 रुग्ण आढळले होते.

नवी दिल्ली - देशात आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी देशात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 41 हजार 195 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3 कोटी 20 लाख 77 हजार 706 इतकी झाली आहे. तसंच दिवसभरात 490 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशातील 4 लाख 29 हजार 669 जणांचा मृत्यू झाला आहे. हळू हळू वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं देशात तिसऱ्या लाटेची भीती निर्माण केली आहे. तज्ज्ञांकडून याआधी सातत्यानं तिसऱ्या लाटेचा इशारा दिला गेला आहे.

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. बुधवारी दिवसभरात 38 हजार 353 रुग्ण आढळले होते. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या देशात 3 लाख हजार 987 जण उपचार घेत असून एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 1.21 टक्के इतकं आहे. देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिलासादायक असे आहे. रिकव्हरी रेट हा 97.45 टक्के इतका आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 3 कोटी 12 लाख 60 हजार 50 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम सुरु आहे. आतापर्यंत 52 कोटी 32 लाख 53 हजार 450 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. लसीकरण सुरु असले तरी वाढती रुग्णसंख्या चिंतेत भर टाकणारी आहे. त्यातच डेल्टाच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. केरळमध्ये दररोज हजारो रुग्ण आढळत असून बेंगळुरुत मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्लाही दिला जात असून गरज असेल तरच बाहेर पडा असं सांगितलं जात आहे. अद्याप काही राज्यात कडक निर्बंध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT