Corona Test sakal
देश

देशात दिवसभरात 44 हजार 899 नवे रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्येत वाढ

कार्तिक पुजारी

देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतील वाढ चिंताजनक आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 44 हजार 899 झाली आहे.

नवी दिल्ली- देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतील वाढ चिंताजनक आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 44 हजार 899 झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 44 हजार 658 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी 46 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले होते. दिवसभरात 32 हजार 988 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात गुरुवारी 496 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 26 लाख 03 हजार 188 झाली आहे, तर आतापर्यंत 3 कोटी 18 लाख 21 हजार 428 नव्या रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. देशात सध्या कोरोनाचे 3 लाख 44 हजार 899 सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत 4 लाख 36 हजार 861 नव्या रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत 61 कोटी 22 लाख 08 हजार 542 लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्राची कोरोना आकडेवारी

राज्यात गुरुवारी 159 रुग्ण दगावले. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1 लाख 36 हजार 730 इतका झाला आहे. राज्यात दिवसभरात 5 हजार 108 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64 लाख 2 हजार 788 झाली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढून 50 हजार 393 इतकी झाली. तर दिवसभरात 4 हजार 736 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 52 हजार 150 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.04 % एवढे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT