देश

मोठा दिलासा! उपचाराधीन रुग्ण दहा लाखांच्या खाली

नामदेव कुंभार

देशातील मृतांचा आकडा वाढत असला तरी उपचाराधीन रुग्णांचा आकडा दिलासादायक कमी झाला आहे. महिनाभरापासून कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. काही राज्यात लावलेल्या कडक निर्बंध आणि लॉकडाउनने उपचाराधीन रुग्णांची वाढ रोखली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 10 लाखांच्या खाली आहे. तर दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही 70 हजारांकडे पोहचली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि उपचाराधीन रुग्णांमध्ये घट होत असली तरी मृताची संख्या चिंतेचा विषय आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 9 लाख 73 इतकी झाली आहे. मागील 24 तासांत देशात 70 हजार 421 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील 72 दिवसांतील ही सर्वात कमी वाढ आहे. रविवारी देशात एक लाख 19 हजार 501 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीन हजार 921 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी देशात 45 हजार 159 उपचाराधीन रुग्ण कमी झाले आहेत.

देशातील सध्याची कोरोना स्थिती -

एकूण कोरोना रुग्ण (Total cases) : 2,95,10,410

एकूण कोरोनामुक्त (Total discharges) : 2,81,62,947

एकूण मृत्यू (Death toll): 3,74,305

उपचाराधीन रुग्ण (Active cases) : 9,73,158

एकूण लसीकरण (Vaccination) : 25,48,49,301

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 37 कोटी 96 लाख 24 हजार 626 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. रविवारी देशात 14 लाख 92 हजार 152 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT