Global Hunger Index Sakal
देश

Global Hunger Index : 'देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न', केंद्राचे तीव्र शब्दांत प्रत्युत्तर

अफगाणिस्तानातील भूक संकट भारतापेक्षाही गंभीर असून, हा देश 109 व्या स्थानावर आहे.

सकाळ डिजिटल टीम

Indian Governement On Global Hunger Index : ग्लोबल हंगर इंडेक्स-2022 संदर्भात 121 देशांच्या क्रमवारीची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारताचा क्रमांक 107 वा आहे. यावर केंद्र सरकारकडून उत्तर देण्यात आले असून, हा रिपोर्ट म्हणजे भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. आयर्लंड आणि जर्मनीतील गैर-सरकारी संस्था कंसर्न वर्ल्डवाइड आणि वेल्ट हंगर हिल्फ यांनी ग्लोबल हंगर रिपोर्ट-2022 जारी केला आहे. ज्यामध्ये 121 देशांपैकी भारत 107 व्या क्रमांकावर आहे.

फक्त ३ हजार लोकांवर सर्व्हे झाला

भारत सरकारने म्हटले आहे की, हा अहवाल केवळ ग्राउंड रिअॅलिटीशी भिन्न नाही तर, लोकसंख्येसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार आहे. विशेषत: कोविड महामारीच्या काळात FAO चा अंदाज गॅलप वर्ल्ड पोलद्वारे आयोजित केलेल्या "फूड इन्सिक्युरिटी एक्सपिरियन्स स्केल (FIES)" सर्वेक्षण मॉड्यूलवर आधारित असून, 3000 लोकांवर केवळ 8 प्रश्नांवर हा अहवाल असल्याचे भारताने म्हटले आहे.

सरकारने 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिले

देशात कोविड-19 च्या प्रादुर्भावकाळात सरकारने मार्च 2020 मध्ये सुमारे 80 कोटी लोकांना मोफत राशन दिले. सरकारने सांगितले की, PM-GKAY योजनेअंतर्गत सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 1121 लाख मेट्रिक टन अन्नधान्य वाटप केल्याचे केंद्राने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

Panchang 1 June 2026 : पंचांग! गुरु कर्क राशीत प्रवेश; कोणत्या राशींना मिळणार शुभ फळ?

उत्तम गुंतवणूक : मिंडा कॉर्पोरेशन (शुक्रवार बंद भाव : रु. ६२४)

Easy High-Protein Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि कुरकुरीत, २० मिनिटांत तयार होणारा हरभऱ्याच्या पिठाचा पराठा; लगेच रेसिपी लिहून घ्या

SCROLL FOR NEXT