INDIA vs Modi 
देश

INDIA vs Modi : 'इंडिया'च्या मुंबईतील बैठकीची तारीख ठरली! आज थोरात-पटोले घेणार शरद पवारांची भेट

रवींद्र देशमुख

मुंबई - पाटणा आणि बंगळुरू येथे झालेल्या दोन बैठकांनंतर विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या 'इंडिया' (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस) आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार याची घोषणा आधीच करण्यात आली होती. आता या बैठकीची तयारी सुरू झाली आहे. या बैठकीची तारीख निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

विरोधकांच्या बंगळुरू येथील बैठकीत आघाडीला इंडिया नाव देण्यात आलं आहे. तसेच मुंबईच्या बैठकीत या आघाडीचा चेहरा आणि आघाडीची समन्वय समिती निश्चित होण्याचा अंदाज आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीहून मुंबईला रवाना होणार आहे. मुंबईत आज संध्याकाळी काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शरद पवार यांची भेट घेणार आहे. (Marathi Tajya Batmya)

आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे. शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटीत बैठकीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच महाविकास आघाडीचं भवितव्य काय, याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय विरोधी पक्षनेतेपदाची चर्चाही होऊ शकते. इंडियाची बैठक २५ आणि २६ ऑगस्ट रोजी ही बैठक होणार आहे.

ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांच्याकडून संयुक्तरित्या या बैठकीचं आयोजन कऱण्यात येणार आहे. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिलं आहे. विरोधकांच्या आघाडीत आतापर्यंत २६ राजकीय पक्ष एकत्र आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT