Vaccine Sakal
देश

प्रत्येकाला लस मिळत नाही तोपर्यंत भारत कोविडमुक्त होणार नाही - एम्स

शुक्रवारी एकाच दिवसात एक कोटी लसीकरण पडलं पार

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला लस मिळत नाही तोपर्यंत भारत कोविडमुक्त होणार नाही, असा इशारा एम्सच्या मेडिकल डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. नवीत विग यांनी म्हटलंय. कालचं भारतात एकाच दिवसात एक कोटी लसीकरण पार पडलं. यावर भाष्य करताना विग बोलत होते. तसेच भारताचं हे महत्वाचं पाऊल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

डॉ. विग म्हणाले, "एकाच दिवसात एक कोटी लसीकरण होणं हे मोठं पाऊल आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण होईल, असा मला विश्वास वाटतो. संपूर्ण देशाचं लसीकरण होणं गरजेचं आहे. त्यासाठी जनतेनं आपल्या सुरक्षेकडं दुर्लक्ष करु नये" प्रत्येकानं मास्क वापरणं गरजेचं असून कोरोनाला हारवण्यासाठी लस घेण्याचा सल्लाही त्यांनी जनतेला दिला.

दरम्यान, शुक्रवारी देशात एक कोटी लोकांचं लसीकरण पार पडलं. भारताच्या या कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं आहे. ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले, "आज विक्रमी लसीकरण झालं. एक कोटी लोकांचं लसीकरण होणं हे मोठ पाऊल आहे. यामध्ये ज्यांनी लस घेतली आणि ज्यांनी लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी काम केलं या सर्वांचा महत्वाचा वाटा आहे."

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील ट्विट करुन हे लसीकरण ऐतिहासिक असल्याचं म्हटलं तसेच त्यांनी देशवासियांचं अभिनंदनही केलं. ते म्हणाले, "या नव्या उच्चांकासाठी सर्वांचा सहभाग आणि प्रयत्न महत्वाचे आहेत. आरोग्य कर्मचारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका व्हॅक्सीन मुफ्त व्हॅक्सीन'च्या निर्धारामुळं हे शक्य झालंय"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT